lagnanatar-aalelya-duravyala-dur-karnaysathi-upay

 

लग्नानंतर जोडीदारामध्ये काही गोष्टीबाबत दुरावा निर्माण होतो. आता तो दुरावा बऱ्याचदा काही गैरसमजामुळे आलेला असतो तर काहीवेळा खूप मोठी कारणे सुद्धा असतात. ‘’मला त्यांनी किंवा तिने विश्वासात घेतले नाही’’ म्हणूनही दुरावा येतो. आणि हा दुरावा काही क्षणासाठी असतो पण काही गैरसमज त्याला मोठे करून टाकतात. या ठिकाणी काही मार्ग सांगितले आहेत त्याच्याने तुमच्या दुरावलेल्या नात्याला जुळून यायला मदत मिळेल.

१)  रुसवा-फुगवा मध्ये मजा असते

 तुमच्या नात्यात जर दुरावा झालाच असेल तर थोडासा रुसवा- फुगवा असतोच त्यामुळे त्याला खूप गंभीरपणे घ्यायची गोष्ट नाही. काही वेळा हे क्षणही खूप मजेशीर असतात यातून तुम्हाला आयुष्यभरासाठी आठवणींची शिदोरी मिळत असते. जसे की, तिला/ त्याला मनवणे त्यासाठी निरनिराळ्या गोष्टी करणे यातही खूप मजा असते. आणि थोडाफार रुसवा लग्न झालेल्या जोडीदारात चालत असतो.

२)  काही गोष्टी ज्यांच्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो

तुमचा जोडीदार कसा आहे, जर तो शंका घेणारा असेल तर त्याला काही गोष्टी ज्या सांगण्यामुळे समस्या येऊ शकते अशा गोष्टी सांगू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की, ही गोष्ट जोडीदाराला सांगायलाच हवी तर तुम्ही सांगू शकता कारण बऱ्याच वेळी जोडीदारही अशा गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला ओळखून निर्णय घ्या.

३) खटकलेल्या गोष्टीबाबत बोला

काही वेळा घरात किंवा नातेवाईकांमध्ये अशा गोष्टी घडतात की, तुम्हाला खटकतात. तेव्हा त्यासंबंधी बोलून टाका उगाच मनात राहू देऊन स्वतःला व नात्यातही कुत्रीमपणा आणू नका. घरात जास्त बोलता येत नसेल कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन बोला. पण मनात राहू देऊन नाते चांगले निभावता येत नाही. नात्यात मोकळेपणा हवा.

४) माफी मागण्याबाबत

तुम्ही बायको/नवऱ्यासोबत खोटे बोललेला असाल, फसवलेले असेल, तर आता खूप मोठा गैरसमज करून त्या गोष्टीला वाढवू नका. अगोदर तुमच्या मनात या गोष्टीचा जो राग रुतून बसलेला आहे त्याला बाहेर काढा. जोपर्यंत त्या गोष्टीचा राग मनात राहील तोपर्यंत दुरावा वाढेल. आणि लगेच त्याबद्धल माफी मागून घ्या. माफी मागणे म्हणजे तुम्ही झुकत असता असे काही नाही तर उलट माफी मागण्याने तुमची प्रतिमा तिच्या/ त्याच्या मनात वाढेल. मग उशीर करू नका. चला तर मग माफी मागायला. . . . . . .

५) एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी

तुम्हाला जोडीदाराबाबत, कोणती गोष्ट त्याला/तिला आवडते हे माहिती असलेच तर तीच गोष्ट करून नात्यात आनंद भरा. उदा. तिला थंड हवेचे ठिकाण आवडत असेल तर तिथे घेऊन जा. तुम्हाला जी गोष्ट माहिती असेल ती करा. शेवटी दुरावा काही क्षणांसाठी असतो. पण त्यात जीवनभराचे नात्याला बिघडवू नका. पण ह्या सर्व गोष्टी करताना अहंकार मध्ये आणू नका. नाहीतर कोणत्याच प्रयत्नांनी दुरावा दूर होणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: