tumchya-paticha-pita-hotanacha-pravas

रोदर असताना तुम्हाला नेहमी काळजी लागलेली असते की  आपले पती कशाप्रकारचे वडील होणार आहेत. आणि बाबांची नवी भूमिका ते कश्याप्रकारे बजावतील. परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही गरोदर राहिल्यावर तुम्हांला तुमच्या पती मध्ये पती पासून पिता कसे होत आहेत हा फरक जाणवायला लागेल.  हा पती पासून पित्यापर्यंतचा प्रवास कसा होतो ते आपण पाहणार आहोत

१. तुमचे पती काळजी घ्यायला लागतील

एक पिता होणं ही  काही सोपी गोष्ट नाहीये. मुल झाल्यावर अनेक पुरुष एकदम बदलून जातात. नेहमीपेक्षा अति जगरुक होतात. याआधी निष्काळजीपणे वागणारे पुरुष अचानक खुप जागरूक आणि काळजी घेणारे होतात. गरोदरपणात तुमची काळजी घेणे. बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे. तसेच प्रसूतीनंतर लहान बाळाची काळजी घेणे. पत्नीची आणि बाळाची सर्व प्रकराची काळजी घेणे. छोट्या छोट्या गोष्टीच्या बाबतीत जागरूक राहणे. हा बदल एक पती पिता होत  असताना होत असतो

२. भविष्यातील तरतुदी

गरोदर असल्याचे कळताच एक पती असताना उगाच कारण नसताना होणारा खर्चचे प्रमाण कमी होते. आधी गरज नसताना होणारी खरेदी कमी व्हायला लागते. भविष्यातील गुतंवणूकबाबत  गंभीरतेने विचार होऊ लागतो. यापूर्वी कधी महिन्याचे बजेट न आखणारे पती गरोदर असतानाचे प्रसूतीनंतचे बजेटची आखणी सुरु करतात.

३. तुमच्या बाबत त्यांचा त्यांचा दृष्टीकोन बदलतो

ज्यावेळी एक पती मुलाला आपल्या मुलाला जन्म देताना आपल्या पत्नीला बघतो. किंवा प्रसूती दरम्यानच्या यातना आणि त्रास त्यांना समजल्यावर तुमच्या पतीच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि जास्त प्रेम निर्माण होतं. आणि तो तुमची काळजी घेतो.

४. घरात जास्त वेळ देण्यास सुरवात होते.

तुम्ही गरोदर असताना सतत तुमच्याशी संपर्कात राहतात. मित्रबरोबर किंवा इतर स्वतःच्या आवडीच्या गोष्टीत वेळ घालवण्यासाठी सुट्टीची वाट बघणारी पती मंडळी शनिवार रविवार ची वाट बाळाशी खेळण्या करत त्याच्याबरोबर वेळ घालवण्याकरता बघू लागतात. बाळ  आणि तुम्हांला  सोडून बाहेर जाणं  त्यांना अपराध्यासारखं  वाटतं  

५. ते प्रत्येक गोष्टीत मदत करू लागतात

छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आलास करणारे तुमची पती आता आळस न कराता तत्परतेने सगळ्या गोष्टी करायला लागतात. जसे बाळाचे डायपर बदलणे तुमची इतर कामे चालू असताना बाळाला सांभाळणे. तुम्हांला इतर कामात मदत करणे. तुम्हांला  काही दुखत खुपत असले तर तुमची काळजी घेणे.

६. बाळाच्या सुरक्षेसाठी जागरूक होणे

बाबा बनल्यावरच एका पती आपल्या बाळासाठी आणि पत्नीच्या सुरक्षेसाठी जास्त जागरूक होतो. बाळ  रांगायला  लागते चालायला लागते त्यावेळी ते तर घरात काही बाळाला टोचेल लागेल अश्या वस्तू नाहीत ना ?  जमिनीवर घसरण्यासारखा काही नाही ना ? या गोष्टीची खात्री करत राहतात. तसेच औषधे खलणी याबाबत जागरूक होतात आणि स्वच्छतेच्या बाबतीत देखील लक्ष  घालायला सुरवात करतात

७. मुलांबरोबर खेळणे/ गप्पा मारणे

सतत व्यग्र असणारे तुमचे पती काम थोडं मागे टाकून बाळाशी खेळण्यासाठी वेळ काढतात, तान्हं असले तर बोबडे बोलून त्याच्याशी गप्पा मारतात. आणि जसं  बाळ  मोठं  होईल तसा  त्याच्याशी खेळतात त्यांचा प्रश्नांना लहान होऊन उत्तर देतात.

मुलाचा जन्म हे एका पती-पत्नीच्या आयुष्यतील नव्या पर्वाची सुरवात असते. जश्या या सगळ्या गोष्टी आईशी निगडित असतात तश्याच बाबांशी देखील निगडित असतात, तुम्हाला  सुरवातीला तुमचे पती कसे बाबा होतील याची काळजी वाटणे साहजिक असते परंतु वरती सांगितल्याप्रमाणे त्यांच्यातील बदल आणि पती कडून पित्याकडे जाणं  हळू हळू जाणवू लागेल

Leave a Reply

%d bloggers like this: