lagnanatrachya-apeksha-swapn-pan-bhram

नात्याविषयी खूप काही माहिती असेल तुम्हाला ! पण तरीही कधीच नाते समजून येत नाही. पण आज तुम्हाला नवरा- बायकोचे नाते कसे असते त्याविषयी सांगणार आहोत. आणि ही गोष्ट जुनी नाही तर ह्या गोष्टी तुम्ही अनुभवत असतात पण तुम्हाला त्या समजून येत नाही. त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला एक वेगळ्याच पद्धतीने सांगणार आहोत. ह्या गोष्टी काही जोडीदाराच्या अभ्यासानुसार घेतल्या आहेत. या ठिकाणी काही चित्रे दिली आहेत आणि ह्या चित्तरप्रमाणे तुमचे नाते आहे का ? की तुमचे नाते खरोखर expectation (अपेक्षा)  प्रमाणे आहे की reality(वास्तवात)  प्रमाणे आहे ते तुम्ही ओळखू शकाल.  आणि या लेखात उलट क्रमाने हेडलाईनला नंबर दिले आहेत ते यासाठी कारण तुमची जी पहिली अपेक्षा शेवटी होते आणि शेवटची अपेक्षा पहिली. समजून घ्या.

        ५) हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. अपेक्षा पण वास्तव्य

लग्न झाल्यावर लगेच एकमेकांबाबत प्रेम व्हायला हवे अशी काही गरज नाही. उलट लग्न झाल्यानंतर हळूहळू प्रेम सुरु होणे चांगले असते. आपल्या जोडीदाराला समजण्यासाठी वेळ घ्या आणि समोरच्या व्यक्तीलाही वेळ द्या. एकमेकांचे मित्र बना. आणि खरोखरचे मित्र बना. त्यासाठी एकमेकांना आदर द्या, नवऱ्याने बायकोचा आदर केला पाहिजे, शांतपणे एकमेकांचे ऐकून घ्या. यातूनच प्रेम उत्पन्न व्हायला लागेल म्हणून हळूहळू प्रेमाला सुरुवात करा.

४) भांडण होणार नाही अशी अपेक्षा

बऱ्याच लोकांना वाटते की, काही जोडीदार बाहेर फिरायला जातात, एकमेकांसोबत असताना खूप खुश असतात, हसत असतात नेहमी, म्हणजे त्याची आवड -नावड एकच असेल. तेव्हा याबाबतीत अपेक्षा काय असते आणि काय होते. म्हणून जरी आवड-नावड-विचार वेगळे असले चालेल फक्त एकमेकांच्या आवड – नावड चा आदर करा.

३) भांडणांबाबत अपेक्षा आणि वास्तव  

लग्नच्या अगोदर वाटते की, भांडण असे काही होऊ देणार नाही पण नंतर भांडण होते. आणि असे छोट्या गोष्टीवरून भांडण होत असते. म्हणून अपेक्षा आणि वास्तवात गोंधळ करू नका.

२) आनंदी जोडीदार एकमेकांच्या नातेवाईकांना पसंत करतात

ह्या गोष्टीची अपेक्षा की, ती माझ्या नातेवाईकांना पसंत करेल किंवा तो करेल. असे काही झाले नाहीतर एकदम तुझ्याबाबत भ्रम तुटला असे काही होऊ न देता. समजून घ्या.

१) एकत्र राहण्याची अपेक्षा आणि वास्तव

जर तुम्हाला वाटत असेल की, जोडीदार एकमेकापासून वेगळे नाही राहू शकत तर हा भ्रम आहे. परिस्थितीनुरूप समजून घ्यावे लागते. पण अशी अपेक्षा ठेवलेली असते की, मी तिच्या/ त्याच्या सोबत राहणार. ही पहिली अपेक्षा असते आणि वास्तव वेगळेच पदरात पडते.

लग्नाअगोदर तुमच्या खूप अपेक्षा असतात. स्वप्ने असतात आणि ते पूर्णच होतील असे नाही. आणि तुटलेत म्हणूनही दुखी होऊ नका. उलट त्यांना समजून जीवनात आनंद निर्माण करा.

Leave a Reply

%d bloggers like this: