mulinchee-kahi-navin-nave

 

घरात बाळ आल्यावर खूप धांदल उडत असते, विशेषतः बाळाचे नाव काय ठेवायचे. त्याबाबत खूप मजाही येत असते. कारण कोण काय नाव सांगते, कोणी वेगळेच, आईची इच्छा अमुक नाव ठेवण्याची तर वडिलांची वेगळी आणि बाळाच्या आजी-आजोबांनी अगोदरच नाव ठरवून दिले असते आणि ते नाव आताच्या आधुनिक (मॉडर्न) आई-वडिलांना आवडत नसते. तेव्हा ह्याबाबत शेवटी काहीतरी नाव ठेवून प्रश्न मिटवला जातो. पण आईच्या मनात रुखरुख राहून जाते की, बाळाचे नाव काही छान वाटत नाही. ह्या ठिकाणी टॉप दहा मुलीचे नावे दिली आहेत.

१) स्वरा

 हे नाव स्वर या नावापासून बनलेले आहे. याचा अर्थ संगीत क्षेत्राशी संबंधित असला तरी त्याचा अर्थ सर्वच ठिकाणी लागू होतो. आणि हे संस्कृत नावापासून बनलेले नाव आहे. खूप कमी लोकांनी माहिती आहे म्हणून तुम्ही युनिक नाव ठेवू शकता. स्वरा म्हणजे स्वतःमधून शक्ती निर्माण करणारी जसे स्वर निघतात.

२) मेहेर

हे सुद्धा नवीन आधुनिक नाव आहे. आणि हे नाव मराठीत खूप कमी ठेवले जाते. तेव्हा तुम्ही याचा विचार करू शकता.

मेहेर हे नाव पंजाबी आहे याचा अर्थ दानशूरपणा असा होतो.

३) नोयरा / नोइरा

हे सध्या नवीनच नाव तयार झाले आहे. खूप भारदस्त व नवीन वाटते. तुम्ही जर जुन्या नावांना खूप कंटाळलेला असाल तर हे नाव देऊ शकता.

४) विविक्त याला आणखी काना देऊ शकता

हे सुद्धा युनिक नाव आहे. हे संस्कृतमधून शोधले गेले आहे. आणि हे नाव भारतासाठीच नवीन आहे.  हे नाव बोलायला कोणासाठीही कठीण आहे कारण कोणीच व्यवस्थित उच्चार करणार नाही पण सवय झाल्यावर उच्चार करता येईल.

५) पिहू

किती गोंडस आणि सुंदर नाव आहे. आणि बोलताना किती हळू आवाजाने बोलावे लागते. पक्षीसारखेच नाव आहे. तुमच्या गोंडस मुलींसाठी या नावाचा विचार करू शकता किंवा घरी हे नाव ठेवू शकता. आणि ही मुलगी तुमच्या जीवनात नक्कीच आनंद भरेल.

६) चारवी

हे नावही नवीन व फ्रेश आहे. बऱ्याच आई-वडिलांनी हे नाव ठेवले आहे.

७) अकिरा

हे खूप वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. या नावाचा उगम तामिळ या भाषेतून झाला आहे. त्यामुळे ह्या नावाचाही तुमच्याकडे चांगला पर्याय आहे.

ही नवीन आणि युनिक नाव तुमच्या मुलींसाठी ठेऊ शकता. जर तुम्हाला आणखी काही नावे तुमच्या मुला- मुलींना द्यायचे आहे तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही तुमच्यासाठी काही नावे नक्कीच सांगू.    

Leave a Reply

%d bloggers like this: