sasusobateche-tumche-nate-kase-sasuchi-ras-sangel

                       

तसे पाहिले तर लग्न म्हणजे अनेक वेडीवाकडी वळणे असणारी पाऊलवाट जी कधी तुम्हाला जपुन चालायला शिकवते तर कधी मुक्त संचार करण्याचा आनंद देते. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा तोल सांभाळण्यात कोणत्या गोष्टीची भूमिका सर्वात मोठी असते? तर ती तुमचे सासूसोबत नाते कसे आहे ? काही सासवा स्वभावाने खूप चांगल्या आणि सुनांचा मनमोकळ्याप्रमाणे स्वीकार करणाऱ्या असतात तर काही फटकळ आणि अपरिपक्व असतात. एका कुटुंबात नव्याने प्रवेश करतांना प्रत्येकाची वेगवेगळी मते किंवा टीका तुमच्या वाट्याला येणे साहजिकच असते. राशिभविष्यानुसार, तुमची आणि तुमच्या सासू-सासऱ्यांच्या राशीचे समीकरण कसे जुळून येते यावर तुमच्या या नात्याचे गणित टिकून असते.पाहूया, या राशींचा प्रभाव कसा पडत असतो.    

    १) कुंभ राशीची सासू

एक आई म्हणून स्वतःच्या मुलांना स्वातंत्र्य आणि मोकळीक देणाऱ्या या राशीची सासू तुमच्याशीही असेच मोकळेपणाने वागेल. या पहिल्या भेटीतच तुमच्या बद्दल तर्क-वितर्क लढवत बसणार नाहीत. तुमची सासू कुंभ राशीची आहे तर मग तुम्ही भाग्यवान आहात. अशा सासूला नाराज करण्या अगोदर थोडा विचार करा.

२) मीन राशीची सासू

काहीशा सालस आणि नम्र दिसणारी मीन राशीची सासू तुम्हाला सतत कामांत गुंतवून ठेवेल. स्वतःच्या कुटुंबा बाबत खूपच दक्ष असणाऱ्या या सासवा वर्षानुवर्षे सांभाळलेला कुटुंबाचा ताबा स्वतःकडेच कायम ठेवणे पसंत करतात. तेव्हा जरा जपून.

३)  मेष राशीची सासू

कुटुंबाच्या काळजी सोबतच यांचे हावभाव आणि शब्द दोन्ही धारदार असतात. फक्त वरवर कठोर असणाऱ्या पण मनातून तुमची काळजी करणाऱ्या सासवा मेष राशीच्या असतात.

४)  वृषभ राशीची सासू

वृषभ राशीच्या सासूला खुश करणे जरा कठीण असते कारण यांना सतत हुकूम सोडण्याची सवय असते.तुमची आज्ञाधारकताच यांचे मन जिंकू शकते.  

५)  मिथुन राशीची सासू

  तुमच्याशी सर्व प्रकारे जुळवून घेणारी आणि दोघींचे नाते फुलवणारी अशी मिथुन राशीची सासू तुम्हाला लाभली असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात. या स्वभावाने अतिशय गोड़ आणि सगळ्या बाबतीत पाठिंबा देणाऱ्या असतात.

६) कर्क राशीची सासू

जेव्हा लग्न होऊन नव्या घरी प्रवेश होतो तेव्हा सासरी आईचे प्रेम आणि जिव्हाळा मिळावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. कर्क रास असणारी सासू म्हणजे दुसरी आईच ! या राशीच्या सासूकडून आईचे प्रेम आणि काळजी तुम्हाला सतत मिळत राहील.

७) सिंह राशीची सासू

या सासूसोबत तुम्हाला एका सत्ताधीशाच्या सहवासात असल्याचा अनुभव येईल. आपले मत सतत दुसऱ्यांवर लादण्याच्या त्यांच्या सवयीचा जेव्हा तुम्हाला वैताग येईल तेव्हा त्याच्या स्वभावातील चांगल्या गोष्टी आठवून पहा.

८)  कन्या राशीची सासू

तुमच्या वैवाहिक आयुष्यात कोणतेही विघ्न येऊ नये. याची त्या पूर्ण काळजी घेतील. तुमची चूक सुधारण्यासाठी त्या तुम्हाला सर्वांसमोर सुनावतीलही पण लक्षात ठेवा.  हे तुमच्या भल्यासाठीच आहे.   

९)  तूळ राशीची सासू

खूपच प्रेमळ आणि सहकार्य करणाऱ्या सासू म्हणजे तुला रास. निस्वार्थ आणि पावलोपावली प्रत्येक कामात पुढे येऊन तुमची मदत करतील

१०)  वृश्चिक राशीची सासू

वृश्चिक राशीच्या सासू मध्ये तुम्हाला एक व्यक्ती सापडेल. त्यांच्या खंबीर आणि कणखर स्वभावामुळेच त्यांनी कुटुंब एकत्र जोडून ठेवलेले आहे. आणि तुम्ही देखील याचा महत्वाचा भाग बनावे.  अशी त्यांची इच्छा असते. त्यांचे अनुभवाचे बोल नक्की तुम्हाला कामी येतील

११)  धनु राशीची सासू

निराशा किंवा नकारात्मकता धनु राशीच्या सासूला अजिबात आवडत नाही. अगदी कठीण परिस्थितीत सुद्धा त्या अतिशय खंबीरपणे वागतात आणि तुम्हालाही बळ देतात .

१२) मकर राशीची सासू

मकर राशीच्या सासूला सर्व काम अगदी नीटनेटके आणि परिपूर्ण हवे असते. तुमच्या कडूनही त्यांची अशीच अपेक्षा असते. पण त्या तुमच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत आणि तुम्हालाही हेच हवे असत

Leave a Reply

%d bloggers like this: