strech-mark-laj-navhe

                     

स्ट्रेच मार्क्स येण्याची अनेक करणे असू शकतात.अनेक वर्षांपासून तुमच्या शरीरावर हे व्रण असतात आणि त्या खुणा पुसट होऊ शकतात पण पूर्णपणे जात नाहीत. बाळंतपणानंतरचे स्ट्रेच मार्क्स घालवण्याचा दावा करणाऱ्या अनेक महागड्या क्रीम्स, तेल आणि औषधांचा तुम्ही कदाचित वापरही केला असेल पण यांतील कोणत्याही उपायाचा खरे तर काहीच परिणाम दिसून येत नाही. तुमचा वेळ आणि पैसे यात फुकट जाण्यासारखेच आहे.

तुमच्या शरीरावर नुकतेच स्ट्रेच मार्क्स ठळकपणे दिसून येत आहेत आणि यांचा तुमच्या बऱ्याच आधी अनूभव घेणाऱ्या आया, माता स्ट्रेच मार्क्स पासून त्यांची कशी सहज सुटका झाली याच्या कहाण्या ऐकवून तुम्हाला आणखी वैताग आणताहेत. यात भर म्हणून की काय, काही लोक तुम्हाला विचारतात हे व्रण का आले, त्यांना कसे लपवाल आणि तुम्ही हे घालवण्यासाठी काहीच का करत नाही?

पण तुम्ही कधी विचार केलाय की, तुम्हाला आलेले हे स्ट्रेच मार्क्स एका खूप सुंदर गोष्टीचे प्रतीक आहे. लपवण्याची लाज बाळगण्याची कुरूप गोष्ट म्हणून याकडे बघू नका. हे व्रण म्हणजे अतिशय विलक्षण आणि खास आठवणींच्या खुणा आहेत. तुमच्या या प्रत्येक व्रणामागे एक कहाणी, काही आठवणी आहेत. गरोदर असतानाची तुमची स्वतःची अशी वेगळी आणि गोड गोष्ट!

एक उणीव किंवा दोष म्हणून नव्हे तर वाघिणीच्या अंगावर असणारे मनमोहक पट्टे म्हणून यांकडे बघा. बाळाला जन्म देतांना तुम्ही एक निर्भीड वाघिणीसारख्या हिमतीने वेदना सोसल्या आणि शेवटी याचे गोड़ फळ तुम्हाला मिळाले याची आठवण कायम हे व्रण करून देत राहतील. तुमच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे तुमचे स्ट्रेच मार्क्स!

समाजाने घालून दिलेल्या सौंदर्याच्या उथळ मापदंडामध्ये स्वतःला बसवण्याचा अट्टाहास करू नका. हेच स्ट्रेच मार्क्स तुम्हाला जाणीव करून देतात की एका जीवाला तुम्ही या जगात आणले आहे आणि ही अतिशय अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे. या जगात एक व्यक्ती नक्कीच असेल – तुमचे बाळ,ज्याला हे स्ट्रेचमार्क्स सुंदर वाटतील कारण यामुळेच तर तो जन्मला आहे. प्रत्येक आईला हा लेख पाठवा. जेणेकरून त्या आईला स्ट्रेच मार्कविषयी चिंता वाटणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: