tanhay-balche-dat-tyavr-upaye

लहान मुलांना दात येण्याच्या वेळी खूप त्रास होत असतो. असे खूप माता सांगत असतात. आणि त्या त्रासाला बघून आई खूप घाबरून जाते. आणि बऱ्याच वेळा त्यांचे चीड-चिडण्याचे कारण त्यांना दात येताना जो त्रास होत असतो त्यात आहे. त्यात ती खात-पीत नाही. काहीतरी तोंडात घेऊन चावायचा प्रयत्न करतात.

दात येण्याचा सगळ्यांनाच त्रास होतो असे नाही काहींना खूपच त्रास होतो तर काहींना अजिबात नाही. काहीवेळा काही बाळांना जन्माला येतानाच एक किंवा दोन दात असतात. ह्याला सदंत जन्म असे म्हणतात.


सामान्यतः बाळांना तिसऱ्या महिन्यापासून ते सव्वा- दीड वर्षापर्यँत पहिला दात येतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या दातांचा आणि बाळाच्या वाढीचा काहीच संबंध नसतो.

१) प्रथम सामान्यतः खालचे किंवा वरचे दोन दात येतात. मग त्यानंतर खालचे आणखी दोन दात यायला लागतात. आणि मग त्यानंतर हळूहळू सुळे व दाढा यायला लागतात. ही सगळी प्रक्रिया बाळ दोन किंवा अडीच वर्ष होईपर्यँत पूर्ण होते.


२) दात येत असताना बाळाच्या हिरड्या शिवशिवतात. तोंडातून लाळ पडत असते. आणि बाळ सारखं काहीतरी चावायला शोधते.

३) बाळाला ताप व उलट्या जुलाब व्हायला लागतात. आणि मातेला वाटते की, बाळाला दात येत असल्यामुळे असे होत आहे. व ही समजूत बऱ्याच लोकांची आहे. पण ते बाळ दात शिवशिवतात म्हणून जे सापडले ते तोंडात घालते, जमिनीवर, पलंगावर जी वस्तू सापडेल ती तोंडात घालते आणि त्याच्या जंतुसंसर्गामुळे जुलाब, ताप असे रोग होतात.

यावर काही उपाय तुम्हाला करता येतील

१) बाळ दात येताना खूप रडतात, चिडीचिडी होतात अशा वेळेला आपला हात बाळाच्या हिरड्यावर मधूनमधून घासावा.

ह्यामुळे बाळाला थोडं बर वाटते.

२) तुम्ही बाळाला टोस्ट, गाजर, बिट किंवा काकडीचा वरचा भाग ( बिया काढून) त्यांना चावायला द्या. चावताना मात्र लक्ष ठेवा बाळाच्या तोंडात मोठा तुकडा जात नाही ना. नाहीतर घशात अडकून बाळाला त्रास होऊ शकतो.


३) दात येत आहारामध्ये चांगलं, पिकलेले केळ, किंवा नाचणीची सत्व असं आलटूनपालटून द्यावं. आणि दात आल्यानंतर साधारणतः दुसऱ्या वर्षांपासून पोळी, भाकरी, चावून-चावून खायची सवय मुलांना लावावी. ह्यामुळे बाळांच्या जबड्याची वाढ चांगली होते आणि पुढे येणारे दात चांगले येतात.

४) दात चांगले यावेत ह्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या किंवा लहानपणी कॅल्शियम असलेलं औषध बाळांना अवश्य द्यावं.  

Leave a Reply

%d bloggers like this: