balachya-pot-dukhanyavr-sat-upaye

 

बाळ आजारी पडल्यावर घरात कोणाचेच चित्त लागत नाही. आणि आई खूप काळजीत पडते. आणि काही समस्या खूपच नॉर्मल असतात पण लहान बाळ लहान असल्याने त्यात सगळ्यांचा जीव अडकतो. पण या समस्यांना तुम्ही सोडवू शकणार. तशातच पोट दुखणे ही समस्या आहे. पण यामध्ये बाळ खूप रडते कारण त्याच्या आतड्या, आणि पोटात दुखत असते. या पोट दुखण्यावर तुम्ही या प्रकारे उपाय करू शकता.

१) गरम पाण्याने शेक करणे

एक मुलायम कापड घ्या त्याला गरम पाण्यात टाकून त्याला पिरगाळून पाणी काढून त्याला पोटावर शेक करा व पोटाला हलक्या हाताने दाब देऊन देऊन शेक करा. यामुळे पोटात जमा असलेले गॅस निघून जातील आणि बाळाला आराम मिळेल.

२) तेलाने मालिश करा

रोज तेल घेऊन बाळाची मालिश करायची प्रत्येक घरात अशी मालिश आजी करत असते. यामुळे बाळाचे शरीर माजुबत होते हाडेही मजबूत होतात आणि पोटही दुखत नाही. आणि भविष्यातही पोट दुखत नाही. यासाठी अनुभवी स्त्रीला किंवा आजीला  सांगा.

३) बाळाला ढेकर यायला हवे

बाळाचे पोट दुखणार नाही यासाठी खाल्यानंतर बाळाला डेकर यायला हवी. जर बाळाला डेकर आला तर समजून घ्यावे बाळाला खाणे पचले आहे आणि यामुळे गॅस बाळाच्या पोटात जमा होत नाही.

४) पायांचा व्यायाम करावा

पाय थोडे दुमडून त्यांची कसरत करावी. यामुळे त्याचे खाणे पचून जाते. आणि त्याचबरोबर त्याला घुडगे  दुखीपासूनही आराम मिळतो. पण असा व्यायाम करताना लहान बाळ आहे हे लक्षात घ्या.  

५) कोमट पाण्याने अंघोळ घालावी

गरम पाण्याच्या अंघोळीने बाळ शांत होऊन जाते आणि त्याचा रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. म्हणून आपल्याकडे बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घालतात. याच्यामुळे गॅस निघून पचनशक्ती वाढते.

६) वेळेवर त्यांना खाऊ घाला

बाळाला ठराविक वेळेनंतर त्याला खाऊ घालत जा. त्यामुळे पोटात गॅस होंण्याची शक्यता असते. आणि पोट दुखण्याला प्रतिबंध होतो. पोटची समस्या निर्माण होत नाही.

७) बाळाला कड्यावर घ्या

बाळाला काही वेळ कड्यावर घेऊन फिरा कारण त्यामुळे त्याचे शरीर थोडे हलके होऊन खाणे पचून पोट साफ राहते.

बाळाला बाहेर फिरवताना व्यवस्थित पॅक करा म्हणजे त्याला सर्दी किंवा वातावरणाचा परिणाम होणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: