prasutinanatr-pati-ya-pach-prakaraani-tumhala-vaitag-aanatat

तुम्ही आणि तुमच्या साथीदाराने मिळून नुकतेच एका नवीन जीवाला या जगात आणले आहे. याविषयी तुमच्या दोघांच्या मनात खूप आनंद आणि सुखाच्या लहरी आहेत. तुम्ही यापूर्वी अनेकदा असं स्वप्न रंगवलं असेल की, तुम्ही दोघे मिळून बाळाचे खूप लाड करत आहात, त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत बसले आहात. त्याचे गोड हसणे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जगातल्या सगळ्या दु:खांचा विसर  पाडत आहेत. आणि  प्रसुतीनंतर येणारे नैराश्य ही एक सत्य बाब आहे व राग आणि चिडचिड ही त्यामधली मोठी बाजू आहे. अनेक मातांनी असे नोंदवले आहे की प्रसुतीनंतर काही आठवडे त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा राग येउन चिडचिड होत राहिली आहे. याबाबतीत प्रामाणिकपणे सांगायचे तर तुमच्या शरीरातील संप्रेरके कारणीभूत आहेत.
इथे तुमच्या नवऱ्याकडून केल्या जाणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला वैताग येतो.

१) प्रत्येक गोष्टीबद्दल मला प्रश्न विचारणे थांबवा. मीसुद्धा इथे नवीनच आहे!
तुमच्या नवऱ्याने बालसंगोपनाची कितीही पुस्तके वाचली तरी बाळाला सांभाळतांना काही प्रश्न आला की तो तुमच्याजवळच येऊन त्याविषयी विचारतो. त्याला काळजी वाटते आणि मनात भीतीही असते की  त्याच्यामुळे बाळाला काही होईल म्हणून तो नेहमी तुमचा सल्ला घेतो. त्याची इच्छा असते की तुमच्या सल्ल्यानेच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. नाहीतर त्या तुम्हीच स्वत: कराव्यात जेणेकरून काही चूक व्हायला नको.

२) त्याला नेहमी उशीर का होतो?
घरी लवकर आणि वेळेवर येण्याची अपेक्षा म्हणजे खूप जास्त असते का? पती वेळेवर घरी न येता मित्रांसोबत बाहेर असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा राग येतो. घरातल्या कामांपासून ते बाळाला सांभाळण्यापर्यंत तुमच्या मागे अनेक गोष्टी असतात. यात तुम्हाला तुमच्या वेळेचेही नियोजन करावे लागते. यातून येणारा वैताग तुम्हाला त्रासदायक ठरतो.

३) एखाद्यावेळी बाळाचे डायपर बदलण्याचे काम तु का नाही करू शकत ?

नेहमी सगळी कामे तुम्हीच का करायला हवीत? तुम्ही रात्रभर बाळाच्या रडण्याच्या आवाजाने झोपू शकला नसाल आणि सारखी जांभई देत तुमचा दिवस गेला असू शकतो. तुम्ही आई म्हणून बाळाची योग्य ती आणि शक्य तितकी सगळी काळजी घेत असता. त्याच्या संगोपनाची जितकी जबाबदारी तुमची आहे तितकीच तुमच्या पतीची देखील आहे. एखाद्यावेळेस त्याने काही काम केले तर तुम्हालाही बरे वाटेल. त्याच्या मदत न करण्याचा तुम्हाला राग येतो. ‘तु डिश साफ कर , मी कपड्यांचं बघतो’ असं जर त्याच्या तोंडून ऐकलं तर तुम्हाला किती बरं वाटेल, नाही ना !४) मी जास्त बोलते ?

बाळाचे डायपर जितक्या वेळा तुम्हाला बदलावे लागते तितक्याच वेळा या काळात तुमचा मूड बदलत राहतो. म्हणून तुम्ही बाळाला सांभाळत असतांना त्याने तुम्हाला कपडे धुवायला सांगितले तर तुम्ही त्याच्यावर ओरडलात. हे तुम्हाला योग्य वाटले ? तुम्हाला लक्षात आले असेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूप संवेदनशील झाला आहात. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना देखील जास्तीची प्रतिक्रिया देत आहात.

५) मला आताही प्रेमाची तितकीच गरज आहे.बाळाला जन्म दिल्यानंतर आणि इतक्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमधून गेल्यानंतर तुम्हाला साहजिकच असुरक्षित वाटत असणार. यात भर म्हणजे जर तुमच्या पतीने त्याचे प्रेम तुमच्याजवळ व्यक्त नाही केले आणि त्याने तुम्ही घेत असलेल्या सगळ्या मेहनतीची दखल आणि कौतुक न करताच असे दिवस निघून गेले तर ही असुरक्षितता अजूनच वाढते. या काळात तुम्हाला प्रेमाची आणि आधाराचीही गरज असते. हे जरूर जाणून घ्या की तुमच्या पतीचे मोठ्याने चावून खाणे, मोठ्या आवाजात बोलणे तुम्हाला चीड-चीड करणारे असले तरीही ‘माझ्याकडून कोणतीच गोष्ट व्यवस्थित का होत नाही?  ‘मी एक चांगला वडील बनू शकत नाहीये का?’  ‘माझी पत्नी सुखी नाहीये का?’ असे प्रश्न त्याच्या मनात सतत त्यालाही सतावत असतात.
त्यामुळे त्याच्यावर राग न करता ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय त्याबद्दल त्याला सांगा आणि चर्चा करा. ह्या गोष्टी छोट्या असू शकतात पण त्याने तुमच्या मनावरचे बरेच ओझे हलके होऊ शकते.
   

Leave a Reply

%d bloggers like this: