balacha-janm-dakhla-kasa-kadhnar-hyavishyi

बाळाला जन्म दिल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाळाचे आणि मातेचे आरोग्य सुखरूप आहे ना. मग त्यानंतर काही आई-वडील बाळाच्या बाबतीत त्याच्या भविष्याचे नियोजन करतात. आणि त्या करिता सर्वात अगोदर करायची गोष्ट म्हणजे “बाळाचा जन्म दाखला” आणि हा कागद किती महत्वाचा असतो ते तुंम्हाला सांगणार आहोत. आणि तो दाखला कसा बनवायचा त्याबद्दलही सांगणार आहोत.

जन्म दाखल्याचे महत्व :

१) ह्या बाळाचा जन्म झाला आहे. या विषयीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे जन्म दाखला. त्याचे आई -वडील कोण, त्याचा जन्म, वेळ, ठिकाण ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख त्यात केलेला असतो . आणि हा दाखला तुम्हाला एक कागदपत्र म्हणून खूप ठिकाणी लागत असतो.

२) बाळाला शाळेत घालायचे तेव्हा हा दाखल्यावरून ते शाळेत घेता. ह्यातूनच वय कळते. तुमची मुलगी/मुलगा सहा वर्षाचा झाला आहे. इ. त्यानंतर बाळ मोठे झाल्यावर त्याचा पासपोर्ट बनवावा लागतो तेव्हा ह्या कागदाशिवाय तुम्ही पासपोर्ट काढूच शकत नाही. तेव्हा बाळाचा जन्म दाखला काढून घ्या बनवला नसेल तर काढून घ्या.


३) बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या २१ दिवसाच्या आत दाखला बनवण्याचा प्रयत्न करा. या वेळात दाखला लवकर निघून जातो आणि जर नंतर बनवण्याचा प्रयत्न केला तर लालफितीचा अडथळा येईल.

जन्म दाखला कोण बनवतो ?

४) जन्म दाखला बाळाचा जन्म शहरात झाला असेल तर नगरपालिका / महानगरपालिका आणि तालुक्यात झाला असेल तहसीलदार कचेरीला, आणि गावात झाला असेल तर ग्रामपंचायत ला बनवला जातो. आणि तिथून तुम्ही काढू शकता. बाळाच्या जन्म झाल्यावर तुम्ही या ठिकाणी नोंद करू शकता.

जन्म दाखल्यासाठी फॉर्म

५) सर्वात अगोदर ज्या ठिकाणी जन्म झालं असेल तिथे बाळाच्या जन्माची नोंद करायची. त्याकरिता त्या – त्या ठिकाणांमधून जन्म दाखल्याचा फॉर्म घेऊन तो २१ दिवसाच्या भरून द्यावा. त्यानंतर तो तुम्हाला मिळून जाईल. फॉर्म तुम्ही त्या-त्या कचेरीतुन घेऊ शकता.

६) माहिती भरताना कोणतीच चूक करू नका नाहीतर नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.

जन्म दाखल्याकरिता कोणती माहिती द्यावी लागेल ?

अ) बाळाचे नाव :

ब) वडिलांचे नाव :

क) आईचे नाव :

ड) जन्माचे ठिकाण :

इ) जन्म तारीख :

ई) बाळाचे लिंग :

फ) आई-वडिलांचा कायमचा पत्ता :

माहिती दिल्यानंतर

जन्म दाखल्याचे शुल्क ऑफिसात जमा करून द्या. जन्म दाखल्याकरिता वेगळा विभाग असतो. तुम्ही नगरपालिकेत किंवा तहसील कार्यालयात जाऊन ह्या गोष्टी करू शकता. आणि गावाच्या साठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाला सांगून करून घ्या.

आणि जर खूप वर्ष झाली असतील आणि बाळाचा जन्म दाखला घेतला नसेल तर तुम्ही जन्माच्या वेळी नोंद केली असेल त्यावरूनही मिळून जाईल. आणि तेव्हा नोंदही केली नसेल तर सर्व माहिती देऊन नोंद करून घ्या.


लक्षात घ्या, जन्म दाखला खूप महत्वाचे कागदपत्र आहे ते बाळाच्या पुढच्या भविष्यासाठी लागणारे आहे तेव्हा त्यात आळशीपणा किंवा हलगर्जीपणा करू नका. खूप लोकांचे पासपोर्ट निघाले नाही आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आहेत. तेव्हा खूप अचूक माहिती देऊन जन्म दाखला काढून घ्या.

ही माहिती इतर मातांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनी बाळाचा जन्म दाखला काढला नसेल तर ते काढून घेतील.

Leave a Reply

%d bloggers like this: