balacha-janm-zalyavar

 

बाळाच्या जन्माच्या नंतर ज्यावेळी तुम्ही बाळाबरोबर घरी येता ते खूप सुंदर दिवस असतात. हे सुरवातीचे दिवस तुम्ही बाळाला जाणून घेण्याचे दिवस असतात. ते निरागस पिल्लू त्याला जाणून घेताना तुमचा दिवस कसा जातो हे कळत नाही या दिवसात काही काही गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आई घाबरून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे बाळाच्या सुरवातीच्या काळत काय काय गोष्टी घडत असतात. आणि कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते. या गोष्टी सांगणार आहोत.

१.  स्तनपान

सुरवातीचे काही दिवस बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. या काळात बाळाला सतत  स्तनपान देणे गरजेचे असते  बाळ या काळात बाळाची वाढ होत असते .तसेच त्याची पचनशक्ती देखील तयार होत असते. त्यासाठी बाळाला  सतत स्तनपान देण्यासाठी तयार राहा. तसेच दूध पाजून झाल्यावर बाळाला कडेवर घेऊन त्याला ढेकर ये पर्यंत पाठीवरून हळुवार हात फिरवा. सुरवातीच्या दिवसातील सतत च्या स्तनपानामुळे बाळाला योग्य ते पोषक घटक मिळतात.

२.बाळाचे वजन वाढणे आणि कमी होणे

सुरवातीच्या काही दिवसात बाळाच्या वजनमध्ये फरक जाणवत असतो. जन्मानंतर बाळाचं वजन कमी होण्याची शक्यता असते. जन्माच्या वेळचे वजन आणि एक आठवड्या नंतरच्या वजनमध्ये फरक असण्याची शक्यता असते. त्यामुळे वजनातील फरकांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु वजनात खूपच फरक जाणवल्यास डॉक्ट्रांचा सल्ला घ्यावा.

३. बाळाच्या झोपेची पद्धत

बाळाच्या जन्मानंतरच्या सुरवातीच्या काही दिवसात बाळ  साधारण दिवसातील १६ ते २० तास झोपत असते. त्यामुळे त्यावेळी त्याला कमीतकमी ४ तासाच्या अंतराने  उठवून स्तनपान दयावे. सुरवातीचे काही दिवस बाळ दिवसातला बराच वेळ झोपत असतात.

४. स्पंज बाथ

बाळाची उरलेली नाळ गळून  पडे पर्यंत बाळाला स्पंजने पुसून काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बाळाच्या जन्मानंतर  तिसऱ्या चौथ्या आठवड्या नंतर नाळ गळून पडल्यावर पूर्ण अंघोळ घालावी. असा सल्ला डॉक्टर देतात.

५. बाळाच्या शीचा रंग

सुरवातीचा काही दिवसात बाळाला शीचा रंग  बदलत असतो. सुरवातीला काळपट आणि ब्राऊन या हिरव्या रंगाची पिवळ्या रंगांची शी होत असते. पण अशी शी सारखी होत असेल तर तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शी मधून रक्त पडल्यास देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

६. शांतता 

बाळाच्या सुरवातीच्या काही दिवस बाळ झोपलेले असले तर त्याचा आसपास शांतता असणे गरजेचे असते. बाळाच्या सुरवातीच्या काही दिवसात झोप पूर्ण होणे आवश्यक असते अन्यथा. सुरवातीच्या काळात झोपेमध्ये येणारा सततचा व्यत्यय बाळाचा मेंदूच्या वाढीसाठी घातक ठरू शकतो. .

Leave a Reply

%d bloggers like this: