best-sunbai-bananaysathi-

जसं नवीन लग्न झालेल्या मुलीला आपली सासरची मंडळी कशी असतील याची काळजी असते तशीच काळजी सासरच्या मंडळींना आपल्या घरात येणारी नवीन मुलगी कशी असेल याची काळजी देखील त्यांना असते. दोन्ही पिढ्यामध्ये एक जनरेशन गॅप असते. अश्यावेळी सासरच्या मंडळींना विशेषतः सासू-सासऱ्यांचं मन जिंकण्यासाठी आणि त्याच्याशी एक चांगलं  नाते निर्माण करण्यासाठी काही गोष्टीचा अवलंब केल्यास हे नाते सासू सासऱ्यांशी असणारे नाते दृढ होण्यास मदत होईल

१ त्यांचा आदर करा

बऱ्याच वेळा दोन पिढीतील वैचारिक अंतरामुळे दरवेळी एकमेकांचे विचार एकमेकांना पटतीलच असं नाही. त्यामुळे तुमच्या मध्ये खटके उडण्याची शक्यता असते. पण असह्यवेळी त्यांच्या वयाचा आणि नात्याचा विचार करून त्यांच्याशी आदराने वागणे गरजेचे असते. यामुळे तुमच्या मनातील त्यांच्या विषयीचा आदर त्यांच्या लक्षात येईल. आणि ते देखील तुमचा आणि तुमच्या मतांचा आदर करण्यास सुरवात करतील

२. तुमच्या पतिच्या बाबतीत गप्पा मारा

तुमच्या दोघांमधली एक दुवा म्हणजे तुमचे पती त्यामुळे पतीविषयक गोष्टी जसे लहानपणीच्या गोष्टी इतर गमती-जमती या विषयावर गप्पा सुरु करा ज्यामुळे तुमच्यामधील संवाद वाढेल

३.  त्यांच्या आवडी-निवडी आणि छंदांमध्ये रस दाखवा.

सासू-सासऱ्यांबरोबरचे नाते दृढ करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. सासू-सासऱ्यांच्या आवडी निवडी आणि छंदाविषयी माहिती करून घ्या. आणि त्यात रस दाखवा. जर सासूबाईना वाचनाची आवड असेल तर त्याना पुस्तक भेटवस्तू म्हणून द्या. पुस्तकांविषयी त्यांच्याशी गप्पा मारा.  तुमच्या त्याच्या आवडीनिवडीत रसघेण्यामुळे त्यांना देखील तुमच्याबद्दल आपुलकी वाढेल. 

४ .त्यांच्याबरोबर खरेदीला किंवा कार्यक्रमांना जा 

 

जर तुमच्या सासूबाईंबरोबर त्याच्या मैत्रीच्या किंवा नातेवाईकांच्या कार्यक्रमांना त्याच्या बरोबर जा. किंवा जर दोघीना खरेदीची आवड असले तर दोघी मिळून खरेदीला जा. एकमेकांबरोबर वेळ घालावा. त्यामुळे दोघींच्या आवडी-निवडी कळण्यास मदत होईल.

५. माफी मागण्याची तयारी ठेवा

जर तुमची चूक झाली असले किंवा काही गैरसमज झाला असले तर तर माफी मागण्याची तयारी ठेवा. कारण याच छोट्या चुका आणि गैरसमज पुढे वादाचे रुप घेतात आणि पूर्ण कुटूंबाला या गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच कधी कधी नाती टिकवून ठेवण्यासाठी थोडा कमीपण घेण्यास हरकत नाही.

सासू-सासऱ्याबरोबर असणारे चांगले नाते  हे तुम्हांला  आयुषभरासाठी साठी उपयोगी ठरू शकते त्याच्याशी असलेल्या तुमच्या चांगल्या नात्यामुळे  तुमचे तुमच्या पतीशी असणारे नाते  देखील दृढ होण्यास मदत होते तसेच तुम्हांला  तुमच्या आई-वडलांची उणीव भासत नाही. मुलांना आजी-आजोबांची माया मिळते. त्यामुळे हे नाते  जपणे गरजेचे असते.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: