dilivharichya-olya-takyanvar-bhannat-upay

तुमची नुकतीच डिलिव्हरी झाली असेल, आणि तुमचे ओले टाके खुप दुखत असतील. तेव्हा ती स्थिती तुमच्यासाठी खूप वेदनादायी असते. आणि त्या ओल्या टाक्यांची खूप देखभाल ठेवावी लागते. बऱ्याच डिलिव्हरीच्या वेळी काही समस्यांसाठी जसे की, episiotomy म्हणजे जन्माच्या वेळी योनी फाटणे, किंवा टाके वेगवेगळ्या परिस्थितीनुसार टाकावे लागतात. आणि काही टाके सामान्यतः सर्वच मातांना सारखेच दिले जातात. त्या टाक्यांची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून त्या कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही. आणि लवकर कोरडे होऊन जातील. त्यासाठी काही उपाय ह्या ओल्या टाक्यांसाठी ज्याने तुमच्या वेदना कमी व्हायला मदत मिळेल.

१) बाळाला जन्म दिल्यानंतर खूप रक्त निघते. आणि सामान्यतः डिलिव्हरीच्या वेळी खूप रक्त वाहत असते. म्हणून त्यासाठी डिलिव्हरीच्या अगोदर तुमची प्रकृती हे सर्व पेलायला सक्षम हवी. आणि ह्या अति-रक्त सांडल्याने मातृत्व पॅड लावायला सांगतात. कारण तुमचे टाके आता कमकुवत असतील आणि त्यासोबत योनीत काही संसर्ग व्हायला नको. यासाठी ४ तासानंतर पॅड बदलून घेत जा आणि अधिक आराम हवा असेल तर कॉटन पॅड वापरून बघा.

२) थोडे मीठ घातलेले पाण्यात अंघोळ करण्याने मदत मिळू शकते. काही मिनिट अंघोळ करण्याकरिता बसा आणि संपूर्ण भाग स्वच्छ झालाय का बघून घ्या. आणि खूप मोठ्या प्रमाणात मीठ टाकू नका. त्याने त्वचा कोरडी पडेल आणि टाक्यांनाही त्रास नको दुखायला.

३) ओला भागावर संसर्गाचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्या टाक्यांचा भागाला स्वच्छ आणि कोरडा राहू द्यायचा. अंघोळ करण्यावेळी टाक्यावर पाणी पडण्याचा संभव असतोच तेव्हा कमी पाणी लागेल अशी व्यवस्था करा. आणि अंघोळ झाल्यावर त्या ओली टाक्यांना कोरडे होऊ द्या. लवकर कोरडे होण्याकरिता त्या टाक्यांना रगडु नका.

४) नुकतीच डिलिव्हरी झालेल्या आईला बाहेर पडता येत नाही. तसे करता आले असते तर टाक्यांसाठी फायदेशीर राहिले असते. कारण टाक्यांनाही थोडीफार हवा शुद्ध हवा लागायला हवी. त्यामुळे टाके लवकर कोरडे होतात. वाटल्यास तुम्ही पायांमध्ये उशी ठेवून बसत जा म्हणजे टाके काही प्रमाणात तरी मोकळ्या हवेच्या संपर्कात येतील.

५) मलावरोधाला दूर करा. कारण कोणत्याही प्रकारचा शरीरावरती टाकलेला दबाव हा त्या टाक्यांवर पडला तर त्यात कळा येतील वेदना होईल. तेव्हा मलावरोध होणार नाही याची दक्षता घ्या. त्यासाठी आहार फायबरयुक्त अन्नचा घ्या. आणि खूप पाणी प्या ४ लिटरपेक्षा जास्त किंवा जेवढे जास्त होईल तेवढे.

६) तुम्हाला टॉयलेटला जायचे असेल. आणि लघवीच्या वेळी टाके दुखत असतात. तेव्हा या समस्यापासून सुटका करण्याकरिता लघवीच्या वेळी मूत्राला पातळ/हळूहळू करून घायचे. ये तुम्हाला थोडेसे विचित्र किंवा आश्चर्यजनक वाटेल पण ही क्रिया प्रभावी आहे. मूत्राला पातळ करण्याकरिता पायांच्या मध्ये कोमट पाणी टाकण्याचा प्रयत्न करावा. आराम मिळाल्यास बरे होईल.

७) केगेल व्यायाम करून बघा. ही व्यायाम पद्धती प्रसूतीच्या वेळी खूप कामास येते. जन्माच्या नंतर नॉर्मल प्रमाणात पेल्विक फ्लोर व्यायाम, योनी आणि सिझेरियन टाक्यांना मदत करतो कारण या भागात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करतो आणि लवकर टाके कोरडे होऊन सुखतात. या उपायांनी तुम्हाला आराम मिळालाच तर नक्की सांगा. आणि इतर मातांनाही सांगून या बाबतीत त्यांची मदत करा.  

Leave a Reply

%d bloggers like this: