dusarya-mulachya-babati-lakashat-ghyavaycha-goshti

घरात दुसरे मुल ज्यावेळी येते त्यावेळी  मोठ्या मुलाच्याबाबत काही गोष्टींबाबत जागरूक राहण्याची गरज असते. कुटुंबातील नवीन मुलाच्या आगमनामुळे मोठया मुलावर आपल्याकडे कमी लक्ष दिले जाते, असा गैरसम ज निर्माण होऊ शकतो.त्यामुळे त्या दोन भावंडांमध्ये एकमेकांबद्दल इर्षा देखील निर्माण होण्याची शक्यता असते. मुलांमधील अंतर हे देखील एक कारण असो शकते. आईचे लहान मुलांकडे जास्त लक्ष देणे हे मोठ्या मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढवू शकते. व एकटेपण देखील वाढवू शकते. त्यामुळे पुढील काही गोष्टींमध्ये पालकांनी  जागरूक असणे गरजेचे असते

१. आई- वडिलांनी आपल्याकडून अजाणतेपणे आपल्या मोठ्या मुलाच्या बाबतीत भेदभाव तर होत नाही ना याची काळजी घ्यावी. यामुळे मुलांमध्ये  एकमेकांबद्दल घृणा निर्माण होण्याची शक्यता असते

२. सतत मोठ्या मुलांवर धाकट्या मुलाची जबाबदारी टाकणे कमी करावे अन्यथा सततच्या जबाबदारीमुळे मुलांना सतत अडकल्यासारखे वाटून सांभाळणाऱ्या मुलाला दुसऱ्या  मुलाचा राग येण्याची शक्यता असते.  

३. तान्ह्या बाळाकडे लक्ष देणे हे आवश्यक असतेच परंतु त्याच बरोबर मोठ्या मुलाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. दिवसातून थोडा वेळ तरी त्यांच्याशी गप्पा मारा. त्याना हवं नको त्याकडे लक्ष द्या. 

४. घरात नवीन मुल येण्याआधी मोठ्या मुलाची  आपल्या परिवारात आणखी एक सदस्य एक लहान बाळ  येणार असल्याची मानसिक तयारी करून ठेवावी. त्यामुळे घरत नवीन सदस्याचे येणे पचवणे सोपे जाईल.

५. सतत बाळाचे कौतुक करून मोठ्या मुलाला  कमी लेखू नका. त्यामुळे काही दोष नसताना निरागस बाळ आपल्या भावंडांचा रोष ओढवून घेईल. आणि कदाचित यामुळे मोठे मुलं  धाकट्या भावंडांचा दुस्वास करेल. 

६. मुलांमध्ये  मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. जर पहिली मुलगी असेन आणि दुसरा मुलगा झाला तर त्या दोघांमध्ये भेदभाव करू नका. हा समानतेचा धडा मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडेल

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

   

Leave a Reply

%d bloggers like this: