garbaht-honarya-balala-uchkya-pregnancy-tips-in-marathi

गर्भवती स्त्रीला तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाशिवाय दुसरे काही सुचत नाही. ती स्त्री कल्पना करत असते बाळ कसा येईल, किती गोंडस बाळाला मी जन्म देणार इ. त्यात काही स्त्रियांना बाळ गर्भात जे काही करत असते त्याचे खूप आश्चर्य आणि गंमत वाटते. त्यातच एक मजेदार गोष्ट होत असते. ती म्हणजे, बाळ गर्भात उचकी घेते. याविषयी आईला खूप विशेष वाटत असते, कारण तिलाही त्या संवेदना जाणवत असतात. आणि बाळही गर्भात खूप वेळा उचकी घेत असतो. तर गर्भात बाळ उचकी का घेतो त्याचे कारण आपण बघू.


१) विज्ञान यावर काय सांगते ?

खरं म्हणजे यावर खूप काही संशोधन झाले नाही आहे. आणि अजूनही स्पष्ट उत्तर यावर मिळाले नाहीये. पण याच्या मागे एक कारण सांगितले जाते. बाळ जेव्हा परिपकव होत असते, तेव्हा त्याचा मधला नर्व्हस सिस्टम उचकी उत्पन्न करतो. बाळाचे पोषण ऍम्नीऑटिक फ्लुईड (amniotic fluid) मधून होत असते. बाळ तिथून आपले पोट भरत असतो. आणि याच दरम्यान त्याच्या फुफ्फुसामधून ऍम्नीऑटिक फ्लुइड निघत असते. आणि याच परक्रियेत बाळ उचकी घेत असतो.

२) बाळाची आई ह्या उचकीला समजून घेत असते. कारण याचवेळी आईच्या पोटात काहीतरी गुदगुल्या सारखे होते. आणि तिचे पोट थोडेसे वरती उठते त्यावरून तिला कळते.


३) यावर आणखी असे सांगितले जाते की, बाळाला थोड्या -थोड्या वेळानंतर डोळे उघडायची इच्छा होते. त्याच्या खूप मोठ्या झोपेतून उठण्यासाठी क्रियाशील होण्यासाठी बाळ गर्भात उचकी घेतो.

४) बाळाच्या उचकीने घाबरू नका. ज्याप्रकारे आपण उचकी घेतो तशीच उचकी बाळ गर्भात घेत असतो. यात डॉक्टरांना दाखवण्याची कोणतीच गोष्ट नाहीये.


५) तुम्ही खुश असा आणि या गमतीदार मातृत्वाचा आनंद घ्या. खूप स्त्रिया गर्भवस्थेत बाळाची उचकी दोन वेळा अनुभवत असते.

६) काही स्त्रियांना अगोदर त्याचा अनुभव होत नाही. पण काही वेळेनंतर मातेला समजून यायला मदत होते. काही बाळ परिपकव झाल्यावर दररोज उचकी घेतात.


याबाबत तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा. खूप छान क्षण तुम्ही अनुभवत आहात. काही मातांना या क्षणांची आठवण आताही हा लेख वाचल्यानंतर येत असेल. तुमचा अनुभव आमच्याशी जरूर शेअर करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: