ghar-swchh-karnysathi-kahi-navin-upay

घरात खूप वस्तू असतात. त्यात काचेच्या, चांदीच्या, दरवाजा त्यातच चहाचे डाग, चिकटपणा असतो. या सगळ्यांना कितीही स्वच्छ केले तरी ते स्वच्छ होत नाही. जसे आहे तसेच दिसते. घर खूप स्वच्छ करूनही, मेहनत करूनही असे वाटते की साफ काहीच झाले नाही. तेव्हा ह्या लेखात तुमची कष्ट कमी होऊन घरही साफ व स्वच्छ होईल त्यासाठी काही आयडिया सांगणार आहोत.

या लेखात तुम्हाला घरातल्या वस्तू स्वच्छ करण्याच्या काही युक्त्या सांगणार आहोत.

१) जर सोफ्यावर डाग पडले असतील खराब झाला असेल तर त्याला बेकिंग सोड्याने साफ करायचा.

 

२) जुन्या मोज्यांना व्हिनेगार लावून घ्या आणि त्याच्याने खिडकी साफ करा. खिडकी चमकायला लागते.

३) निंबूच्या फोडीने नळ साफ करा. नळ स्वच्छ व जंतुविरहित होतो.

४) जर चिकट/चिगट डाग पडले असतील तर त्याला खडूने साफ करायचे. ज्या ठिकाणी चिगट भाग असेल त्याला खडूने साफ करू शकता.

५) तेल आणि बेकिंग सोडा घेऊन दरवाजा साफ करू शकता.

६) कॉफी किंवा चहाचा डाग बेकिंग सोड्याने साफ करू शकतात.

७) जर घरात काच तुटला तर ते शोधायला आणि उचलायला कठीण होते तेव्हा तुम्ही त्यासाठी ब्रेडने उचलू शकता.

८) चांदीच्या वस्तुंना चमकवण्यासाठी सोडाचा वापर करा.

९) अल्युमिनियमच्या भांड्यात काचेचे ग्लास ठेवून बेकिंग सोडणे त्या ग्लासला चमकवू शकता. आणि त्यावरचे डागही निघतील. 

१०) कपड्यात पेंट व रंग लागल्यावर त्याला लेजरने साफ करावे. 

या उपायांनी घरातल्या वस्तू स्वच्छ करून स्मार्ट आई बना. त्याचबरोबर नवनवीन घर स्वच्छ करण्याचे उपाय करून बघा. त्यामुळे तुम्हाला घर स्वच्छ करायला कंटाळा व आळशीपणा वाटणार नाही. उलट उत्साह वाटेल. म्हणून करून बघा नवीन युक्त्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: