office-ani-khsagi-ayushyacha-samtol-kasa-sadhal

 

मुलांच्या जन्मानंतर तुम्हांला अचानक खूप जबाबदाऱ्या वाढल्याची जाणीव होत असते. कधी-कधी जबाबदाऱ्यांचे ओझे होऊ लागते अश्यावेळी ऑफिस आणि खासगी आयुष्याचा समतोल कसा साधायचा  याबाबत काही टिप्स देणार आहोत. .

१.प्राधान्यक्रम ठरवा

तुम्हांला  तुमच्या कामाला  आणि तुमच्या कुटुंबाला दोन्हीला तुमचे १०० टक्के देणे गरजेचे असते. अश्यावेळेला  वेळ आणि प्रसंग बघून तुमचा प्राधान्यक्रम ठरावा. तुमच्या मुलाच्या शाळेतला कार्यक्रम आणि तुमची महत्वाची मिटिंग एकाच वेळी असेल तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल. दरवेळी ऑफिसच्या कामाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्त महत्व देणे गरजेचे नाही. नीट विचार करून प्राधान्यक्रम ठरावा.  

२. वेळेचे व्यवस्थापन

तुमच्या कामाची यादी बनवा. कामाच्या प्राधान्यक्रमानुसार कामाच्या वेळा ठरावा. कामे वाटून घ्या. ऑफिसच्या कामाच्याबाबती देखील वेळच्या वेळी कामे करून कामाचा ताण कमी करा. कामाचा ताण  कमी असल्यावर वैयक्तिक आयुष्यातील ताण देखील कमी होतो. कामाचे नीट नियोजन करा.

 ३. नाही म्हणायला शिका

जर कामाच्या ठिकाणी तुम्हांला तुमच्या कामाव्यतिरिक्त कोणी जास्त काम करण्याची विनंती करत असतील तर त्याला कधी-कधी नाही म्हणायला शिका.आणि त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही कारण ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही गोष्टी सांभाळताना काही गोष्टींना नाही म्हणणे आवश्यक असते

४. मुलांची काळजी

ज्यावेळी तुम्ही पुन्हा कामाला सुरवात कराल त्यावेळी मुलाचा सांभाळ याबाबत तुमच्या डोक्यात प्रथम विचार येतो अश्यावेळी मुलांना चांगल्या पाळणाघरात ठेवणे किंवा आजी-आजोबांकडे सोपवणे आणि कामावर जाणे म्हणजे जबाबदारी झटकणे असे होत नाही. त्यामुळे जर असे करत असाल तर वाईट आणि अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. फक्त पाळणाघरात ठेवणार असाल तर पाळणाघराबाबत कसून चौकशी करा आणि मगच आपल्या मुलाला तिकडे ठेवा.

५. स्वतःची काळजी घ्या

तुम्हांला  सगळे सुपर मॉम म्हणून ओळखत असतील. तुम्हांला  देखील सगळ्यांसाठी  बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटत असतील तरी तुम्हांला  देखील काही मर्यादा आहेत . जर तुम्ही सगळ्यांसाठी बराच काही करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष केलंत  तर त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण कुटुंबावर होणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. सकस आहार घ्या योग्य तो व्यायाम करा. आवडत्या गोष्टी छंदासाठी वेळ काढा.  

Leave a Reply

%d bloggers like this: