strech-marvar-upay

गरोदरपणात स्ट्रेच मार्क येणे की सामान्य व सगळ्याच स्त्रियांना होणारी गोष्ट आहे. स्ट्रेच मार्क वरून खूप दुखी व्हायचे कारण नाही. स्ट्रेच मार्क ही निसर्गाची खून असते जी तुम्हाला बाळाच्या जन्मामुळे मिळत असते. आणि हे निशाण वेळेनुसार चालले जातात. पण जर काही ह्या खुणेमुळे काही समस्या असेल आणि काही मातांचे स्ट्रेच मार्क अजूनही गेले नसतील त्या माता खाली दिलेले उपाय करू शकता.

१) अलॉय व्हेरा

याचा वापर आपण खूप ठिकाणी करत असतो आणि हे स्ट्रेच मार्कावरसुद्धा खूपच गुणकारी आहे. जर तुम्ही नियमितपणे ह्याला वापरले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. याचा उपयोग दोन पद्धतीने करायचा १. याचे पान घेऊन त्वचेवर घासायचे आणि त्यानंतर त्याला धुवून काढायचे. अलॉय व्हेरा पानाच्या जेल मध्ये व्हिटॅमिन अ, आणि व्हिटॅमिन ई यांच्या तेलाचे मिश्रण बनवून घ्यायचे आणि ज्या भागात स्ट्रेच मार्क असतील त्या भागात लावायचे हळूहळू स्ट्रेच मार्क ब्लर व्हायला लागतील.

 

२) कोको बटर

हे त्वचाकरीता नैसर्गिक मॉइस्चराइझर चे काम करत असते. यांच्यात अँटी- एक्ने गुण असतात ज्यात रक्तचे वाहन जलद होण्याचे गुणही असतात. आणि स्ट्रेच मार्कलाही दूर करत असते. दररोज दोन वेळा त्या भागात लावायचे.

 

३) तेल

खूप तेल आहेत जी स्ट्रेच मार्कवर वापरली जातात. त्यात कॅस्टर तेल, आलिव्ह चे तेल, खोबरेल तेल आहेत. तुमच्या कडे जे आहे त्या तेलाने हळूहळू मालिश करा. कॅस्टर तेल मालिश करण्याचावेळी तेलाच्या जागेवर गरम पॅड ठेवा.

४) निंबूचा रस

निंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते. निंबूमध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुणांमुळे स्ट्रेच मार्क सोबत इतर डाग सुद्धा काढत असते. त्यासाठी निंबूमधून रस काढून त्याला स्ट्रेच मार्कच्या भागावर मालिश करावी आणि त्यानंतर गरम पाण्याने त्याला धुवून काढावे.

५) बटाट्याचा रस

बटाटा हा पेशींच्या आरोग्यसाठी महत्वाचा पदार्थ मानला जातो. आणि बटाट्याचा रस त्वचेच्या सेल (cell) ला तेज प्रदान करत असतो. त्यामुळे स्ट्रेच मार्कावर याचा फरक पडून त्यातून सुटका होते. त्यासाठी एका बटाटयाच्या कापने स्ट्रेच मार्कवर घासायचे. जर या प्रकारे रोजच तुम्ही करणार तर लवकरच त्याचा फरक तुम्हाला दिसून येईल.

६) साखर

साखर नैसर्गिक एक्सफॉलियंट आहे. याच्याने त्वचेतील मृत त्वचाचे सेल निघून जाण्यास मदत मिळते. त्यासाठी थोडे पाणी, निंबू चा रस आणि बदामाचे तेल आणि एक मोठा चमचा साखर हे सर्व मिश्रणाचे लेप बनवून घ्या. आणि स्ट्रेच मार्कवर घासून घ्या आणि त्यानंतर त्याला पाण्याने धुवून घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: