balachee-zop

   बाळाला येणारी झपकी (डुलकी) किती महत्वाची असते याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का ? झपकी बाळाच्या स्मरणशक्तीच्या विकासात खूप मदत करत असते.

दिवसामधला खूप वेळ बाळ झोपण्यात घालवत असतात. तुम्हाला माहिती असेलच की, बाळाचा झोपण्यातूनच खूप विकास होत असतो. आणि जे जितका जास्त वेळ झोपणार तितकी त्यांची प्रकृती उत्तम राहील. 

शरीराचा विकासाबरोबरच त्यांची स्मरणशक्तीही तितकी वाढत असते. आणि त्यांची स्मरणशक्ती झोपण्याची वेळीच वाढत असते. बाळाला जर तुम्ही झोपेत असताना काही सांगाल तर त्याला त्याची आठवण राहते. तुम्हाला तुमच्या बाळांच्या बाबतीत असे अनुभव आले असतीलच.

काही शिकवल्यानंतर बाळाला झोपवले आणि त्याला नव्या काही गोष्टी शिकवल्या किंवा त्याने बघितल्या आणि बाळाला डुलकी लागली. तर त्या सर्व गोष्टी बाळाच्या जाशतशा लक्षात राहून जातात.   आणि हाच प्रयोग तुम्ही बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाठी करू शकता. यामुळे बाळांना कठीण गोष्टी शिकवायला अडचण येणार नाही.

 

 

 

मोठ्यानं जेव्हा लहान मुलासारखे झोप असे सांगितले जाते तेव्हा खूप गाढ आणि शांततापूर्ण झोपणे असा त्याचा अर्थ होतो. आणि मोठेही असे झोपले तर त्यांचीही स्मरणशक्ती सशक्त होईल. काही बाळ खूप कमी झोपत असतात तेही खूप शिकत असतात पण लहान मुलांनी जास्त झोपणे त्यांच्या प्रकृतीसाठी खूप चांगले असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: