balachya-janamacya-pahilya-varshat-honarya-7-samnay-ajaranacha-samana-ksa-karala-xyz

जन्माच्या पहिल्या वर्षात आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता तुमच्या बाळात विकसित झालेली नसते,त्यामुळेच या काळात ते वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे,बाळामध्ये अँटीबॉडी(प्रतिद्रव्ये) ची निर्मिती कमी प्रमाणात होत असते कारण, अनेक रोगजंतू आणि आजारांच्या बाळ संपर्कात आलेले नसते .

१. सामान्य सर्दी

लक्षणे: खोकला ,घसा सुजणे,चोंदलेले नाक,नाकातुन सु-सु आवाज येणे आणि हलकासा ताप

उपचार : बाळाचे नाक स्वछ करण्याने त्याला मोकळेपणाने श्वास घेता येईल आणि हाच सर्दीवरचा सर्वोत्तम उपचार आहे. जास्त प्रमाणात औषधे घेणे बाळासाठी हानिकारक ठरू शकते. नाक मोकळे करण्यासाठी वाफ देणे,नाकात फवारण्याचे द्रव किंवा कोरड्या सर्दीला पातळ करणारा वाफारा वापरण्याने खूपच दिलासा मिळतो. या उपायांनी फरक जाणवला नाही तर डॉक्टरांचा सल्ल्याने औषध उपचार चालू करावेत.

प्रतिबंध : इतर आजारी लोकांच्या संपर्कात येण्यापासून बाळाचा बचाव करावा आणि आसपास स्वच्छता राखावी. बाळ आणि त्याच्या खेळणी,दुधाची बाटली,चोखणी निर्जंतुक ठेवा.

२. जुलाब

लक्षणे: वारंवार होणारी पातळ शौच ज्यात शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असू शकते

उपचार : बऱ्याचदा अतिसार किंवा जुलाब काही दिवसात आपोआप बरे होतात. बाळाच्या स्थितिवर लक्ष ठेवून गरज असेल डॉक्टरांना ताबडतोब कळवा. बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ नसे यासाठी तोंडाने द्यायचे द्रावण परिणामकारक ठरते.

प्रतिबंध: बाळाच्या आसपासचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा. पहिल्या पहिल्या काही महिन्यांत दूध पाजणे टाळा त्याऐवजी ताजे आणि घरी बनवलेले स्वच्छ अन्न बाळाला द्या.

३. विषाणूंमुळे श्वसनमार्गला होणारे संक्रमण

लक्षणे: बहुतेक वेळेला सामान्य सर्दीप्रमाणेच खोकला,वाहणारे नाक अशी या आजाराची लक्षणे असतात. पण उपचारांविना फुफ्फुसांना सूज येणे ,छातीत घरघर अशी स्थिती ओढावू शकते. फुफ्फुसांना तीव्र संक्रमण झाल्यास न्यूमोनिया ही होऊ शकतो.

उपचार : आजाराच्या सुरुवातीला सर्दीची औषधे पुरेशी असतात पण ही लक्षणे एक आठवाड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

प्रतिबंध:बाळाच्या आसपास स्वच्छता ठेवा, धूम्रपान करू नका तसेच बाळाची खोली निर्जंतुक असू द्या. बाळाला हाताळण्या अगोदर हात साबणाने स्वच्छ धुवा जेणे करून संक्रमण होणार नाही.

४. ताप

लक्षणे: चेहरा लालसर होणे,शरीराचे तापमान वाढणे

उपचार: बाळाला फारसा त्रास होत नसेल तर पाण्याने अंग पुसणे आणि डॉक्टरांनी सुचवलेली वेदनाशामक औषधे देणे पुरेसे असते. पण ताप जास्त वाढला तर बाळाला डॉक्टरांकडून तपासून आणा.

प्रतिबंध: तापापासून बाळाचा बचाव करण्याचा सोपा उपाय म्हणजे रोगजंतूंपासून बाळाला दूर ठेवणे.आसपासचा परिसर तसेच स्वतःला आणि बाळला स्वच्छ,निर्जंतुक ठेवा. बाळाला द्यायचे अन्न मऊ शिजवलेले आणि जंतुविरहित असावे.

५.कानाला होणारे संक्रमण

लक्षणे : बाळाचे अस्वस्थ होऊन रडणे,रात्री झोपेतून सारखे उठणे,चिडचिडेपणा

उपचार: कानात दुखत असल्यास वेदनाशामक औषधे बाळाला द्यावीत.कानातील घाण निघण्यासाठी बाळाला सरळ झोपवा .वेदना वाढल्यास बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके द्यावीत.

प्रतिबंध: कुठल्याही प्रकाराच्या ऍलर्जी पासून बाळ दूर ठेवा. पुरेसे स्तनपान करा आणि संक्रमण वाढू नये यासाठी सर्दीचा योग्य उपचार करून पूर्णपणे आटोक्यात आणा.

६. हात,पाय आणि तोंडाच्या आतील भागात येणारे फोड

लक्षणे: बाळाला जाणवणारा थकवा ,ताप,घसा दुखणे, हात,पाय आणि तोंडाच्या आतील भागात फोड येणे,त्वचेवर पुरळ येणे

उपचार: थंड पेय आणि बर्फाने बाळाच्या दुखऱ्या घशाला आराम मिळेल. मसालेदार अन्न आणि पेय टाळा. बाळाच्या वेदना कमी

प्रतिबंध: तुमचे हात वारंवार धुण्याने बाळाचा रोगजंतूंपासून बचाव होईल.

७. गॅस्ट्रो

लक्षणे: उलटी होणे,पोटात वेदना आणि अतिसार

उपचार:अतिसारापासून बचावासाठी बाळाला भरपूर पातळ पेय पाजा. शरीरातुन कमी झालेल्या पाण्याची काम्राट भरून काढण्यासाठी मीठ आणि साखरेचे द्रावण बाळाला पाजत राहा.

प्रतिबंध: संक्रमणापासून बचावासाठी स्वतःला आणि बाळाला स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा.

तुमचे छोटेसे बाळ सतत आजारी पडणे सहाजिक आहे. तुमची प्रेमळ काळजी आणि कुशीची ऊब त्याला यातून सहज बरे करेल. बाळाला होऊ शकणाऱ्या सामान्य आजारात घ्यायची काळजी,लक्षणे आणि उपचार यांची माहिती ठेवा म्हणजे अशा वेळी तुम्हाला तणाव येणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: