navmatanchya-manswasthysathi-kahi upay-xyz

आता तुम्ही एक नवीन आई असल्याने तुम्हांला विविध स्तरावर तणाव पूर्ण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. तुम्ही नुकतंच एका जीवाला जन्म दिलेले असतो. हे खूप सुंदर असले तरी त्या छोट्याशा जीवाची काळजी घेताना तुम्ही शाररिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर थकता. या सुरवातीच्या काही महिन्यात कश्याप्रकारे शांतता आणि मनस्वास्थ्य कसं टिकवून ठेवलं यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

१. योगा,ध्यानधारणा आणि व्यायाम

  लहान मुलांना सांभाळताना तुम्हांला इतर गोष्टीसाठी लोकांमध्ये मिसळण्यासाठी काही वेळ मिळत नाही आणि जरी वेळ मिळाला तरी तुम्हांला डायपर दुधाची बाटली अश्या विषयांवर बोलायची इच्छा नसते. त्यामुळे योग क्लास किंवा मेडिटेशन क्लास किंवा लहान मुलांना घेऊन जाता येईल अश्या ठिकाणी जा सध्या व्यायाम प्रकारच्या क्लासला जा . त्यामुळे तुम्हांला बाळाला एकटं सोडावं लागणार नाही आणि तुमचा व्य्याम होईल इतर लोकांशी संपर्क वाढेल आणि तुमचा तणाव कमी होण्यास मदत होईल

२. अंघोळीचा आनंद घ्या

आई झाल्यावर शांतपणे अंघोळ करायला मिळण्यासारखं सुख नाही. बाळ झोपलं असले किंवा बाळाला सांभाळायला कोणी असले तर. मस्त शांतपणे अंघोळ करा. अश्या अंघोळीमुळे तुम्हांला खुप प्रसन्न वाटेल. दिवसभरातुन एकदातरी आहि गरम पाण्याने अंघोळ करणे शॉवर घेणे तुमचा दिवसभराचा थकवा घालवतो मन शांत होते. आणि पुन्हा बाळाची काळजी घेण्यास तुम्ही तयार होता.

३. चालायला जा

 

 

बाळाच्या जन्मांनंतर काही दिवसांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज सकाळी बागेत शुद्ध हवेच्या ठिकाणी कमीतकमी ३० मिनटे चालायला जा. अश्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला देखील बरोबर नेऊ शकता. त्यामुळे तुम्हांला शुद्ध हवा मिळेल.तसेच तुमचा तणाव देखील कमी होईल. आणि हा सकाळचे चालणे तुम्हांला ताजेतवाने ठेवेल.

४.चूक झाली तर ठीक आहे.

जर समाज तुम्ही गजर लावायला विसरलात, उशिरा उठलात कारण तुम्ही रात्रभर जागून दमलेले असता, जर पतीचा डब्बा करायला विसरलात, दूध उतू गेले. काही सामान आणायचं राहून गेलं अश्या छोट्या छोट्या चुका मनाला लावून घेऊ नका. तुम्ही देखील एक व्यक्ती आहेत यंत्र नाही त्यामुळे या चुका तुमच्याकडून घडू शकतात तर या गोष्टीबाबत स्वतःला अपराधी मनू नका. चूक झाली तर ठीक आहे त्यामुळे मनस्वास्थ बिघडून घेऊ नका. सध्या तुम्ही पेलत असलेली जबाबदारी या सगळ्या गोष्टीपेक्षा खूप मोठी असून या गोष्टी त्यापुढे गौण आहेत.

५.स्वतःसाठी थोडा वेळ काढा

कमीत कमी आठवड्यातून थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढून ठेवा. वाचन करणे ,गाणी ऐकणे, एखादा सिनेमा बघणे. मैत्रिणींना फोन करा,गप्पा मारा.खरेदीला जा यामुळे तुम्हांला वाटेल आणि त्याच त्याच दिनक्रमाचा कंटाळा येणार नाही . सुरवातीचे काही महिने हे उपाय वापरल्याने तुमच्या मनावर ताण-तणाव येणार नाही आणि मनःस्वास्थ लाभेल 

Leave a Reply

%d bloggers like this: