ya-goshti-tumchya-ptila-tumchya-kadun-apekshit asatat

जोडीदाराबरोबरचं नातं असं असतं ज्यात बऱ्याच गोष्टी न बोलताच एकमेकांना कळतात त्याचसाठी शब्दांची गरज लागत नाही.पण काही अश्या गोष्टी असतात ज्या पतीला तुमच्या कडून अपेक्षित असतात. त्या आपण पाहणार आहोत.

१. माफी मागणे

कधी-कधी एखादी चूक पटकन काबुल करून शांतपणे माफी मागणे किंवा आपली चूक मान्य  करणे हे तुमच्या पतीला अपेक्षित असते. आणि ही माफी तुमचे नाते मजबूत करायला आणि नात्यातील गैरसमज दूर करायला उपयुक्त ठरते.  

२. आभार मानणे

आपल्या माणसाचे आभार मानणं म्हणजे आपल्या माणसाला परकं करणं  होय परंतु कधी कधी आभार मानणं,आपल्या त्याच्या केलेल्या मदतीची जाणीव ठेवून कधीतरी त्याचे आभार मानणे  आवश्यक असते त्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होते.

३. कौतुक करणे

कौतुक झालेले कोणाला आवडत नाही  त्यातून आपल्या जोडीदाराकडून झालेले कौतुक हे  प्रत्येकाला आवडते. पतीने एखादा पदार्थ केला तर त्याचे नक्की कौतुक करा. त्याने नवीन कपडे घातल्यालावर त्याला चॅन दिसतोयस असे सांगा . त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करा. यामुळे त्यांना तुम्हांला  त्यांचे कौतुक आहे तुम्ही त्यांची कदर करता याची जाणीव होईल.

४. विश्वास दाखवणे

नात्यात विश्वास असणे खूप गरजेचे असते. तुम्ही तुमच्या पतीवर वेळोवेळी विश्वास दाखवणे गरजेचे असते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढतो. तुम्ही तुमच्या पतीवर दाखववलेला विश्वास हा त्यांचासाठी खूप महत्वाचा असतो.

५.प्रेम व्यक्त करा

तुमचे तुमच्या पतीवर किती प्रेम आहे हे व्यक्त करा. असे प्रेम व्यक्त केलेले त्यांना आवडत असते. जर ते कुठे बाहेरगावी गेले असतील ऑफिस मध्ये असतील आणि तूम्हाला  त्यांची आठवण येत असले करामत नसेल तर या गोष्टी तुम्ही त्यांचा जवळ व्यक्त करा आपल्यावर असणारे प्रेम जर कोणी व्यक्त केले तर ते प्रत्येकालाच आवडते.

अश्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगणे व्यक्त करणे आवश्यक असते,ज्यामुळे एकमेकांमधील प्रेम वाढून नाते  दृढ होण्यास मदत होते.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: