balachya-angavrche-til

आपल्या कडे खूप लोकांचा शरीरावर असलेल्या तिळ वर विश्वास असतो. पण ते कितपत खरे असते आणि होते ते सांगता येत नाही. खाली दिलेला लेखही तीळ वरून आहे. पण या लेखात गोष्टी अशाच होतील असे नाही. कदाचित काही तुमच्या बाळाच्या बाबतीत खऱ्याही होतील. म्हणून वाचून बघा. आणि खऱ्या ठरल्याचं तर खूप चांगलेच होईल.

१) उजव्या गालावरील तीळ

     उजव्या गालावर असलेल्या तीळ वरून तुमचा मुलगा हा लग्न झाल्यावर खूप श्रीमंत होईल. खोटे वाटत असेल तर मुलाच्या लग्नानंतर बघू शकता.

२) वरच्या ओठांवरती

ज्या मुलांच्या ओठाच्या वरती तीळ असते ती मुले त्यांच्या होणाऱ्या मित्रांपेक्षा खूप मोठ्या पदावर असतील. ते जिद्दी असतात आणि याच कारणामुळे ते तितक्या उंचीपर्यंत पोहोचतात.

३) नाकावर

जर तुमच्या बाळाचे तीळ त्याच्या / तिच्या नाकावर किंवा नाकाच्या थोड आजूबाजूला असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, ते बाळ मोठे होऊन स्वतःच्या जीवावर श्रीमंत होईल. तितका तो कर्तबगार असतो किंवा असते ही गोष्ट मुलींनाही लागू पडते. जगाची प्रदक्षिणा ही बाळ करतील. फिरण्याचीही खूप हौस असते यांना.

४) पायाच्या तळव्यावर

या बाळांचे पाय घरात टिकत नाही. ते नेहमी बाहेरच जाण्याचे स्वप्न बघतात आणि काही अंशी उतरवतात. आणि यासाठी त्यांना आई-वडिलांचीच खूप मदत होत असते.

५) कंबरेवरचा तीळ

या बाळांना धोपट मार्गावर चलण्याची इच्छा नसते ही बाळ स्वतःचा मार्ग तयार करतात. त्यांना कुणाची कॉपी करणे आवडत आणि. ही बाळ आई-वडिलांचे ऐकत नाही कारण त्यांना स्वतःचा विचार असतो. आणि तेच ते करत असतात.

६) डाव्या हातावरचे तीळ

डाव्या हातावरची तीळ असलेली बाळ बदल करण्याचा विचारात असतात. खूप मेहनती असतात. ही मुलेही जीवनात मोठ्या पदावर आपल्या मेहनतीने जातात. ज्या बाळांना तीळ नसते त्यांचेही नशीब असतेच आणि सर्वच बाळ जन्मापासून भाग्य घेऊन येतात. आणि त्यांचे भाग्य आई-वडील बदलवत असतात. आई-वडील पाठीशी असताना त्यांना कोणत्या नशिबाची गरज नसते. आशावादी आणि सकारत्मक म्हणून हा लेख लिहला आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: