dhilya-stanana-kar-bay-bay-beauty-tips-in-marathi

खूप महिलांना ढिल्या स्तनांची मोठीच समस्या वाटते. त्यांना आपल्या सौंदर्याच्या बाबतीत ढिले स्तन सहन होत नाहीत. आणि खरं म्हणजे विशिष्ट वेळानंतर स्तन ढिल्ले होणे ही सर्वच स्त्रियांची समस्या असते. पण काही स्त्रियांचे वेळेअगोदरसुद्धा स्तन ढिल्ले होऊन जातात. आणि यात काहीच वाईट आणि चुकीचे नाही की, तुम्हाला स्तन ढिल्ले होऊ द्यायचे नाही आहेत. मग ते कोणत्याही वयात किंवा वेळी असो.

स्तन ढिल्ले होण्याची कारणे

याबाबत काही मत आहेत पण त्या मतांमध्ये खूप मतमतांतरे आहेत आणि वाद सुद्धा आहेत. खाली आपण बघूया नेमकी स्तन खाली येण्याची काय कारणे आहेत.

१) गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत तर त्यांच्या हार्मोनल बदलामुळे स्तन खाली येत असतात किंवा ढिल्ले होतात.

      पण काही स्त्रियांचे स्तन खाली दिलेल्या कारणांमुळे येत असतात.

२) काही स्त्रिया याबतीत खूप रागावतात कारण, गुरुत्वाकर्षण त्यांच्यासाठी स्तन खाली यायला खूपच कारणीभूत असतात. स्त्री जर खाली झुकलीच तर तिला याचीच सर्वात जास्त भीती वाटत असते.

३)  वय वाढल्यावर आपोआप स्तन खाली यायला लागतात कारण स्तनात असणारे लिंगामेन्ट्स हे वयानुसार स्तनाची लवचिकता कमी करत जाते. काही वेळा स्तनात गाढ किंवा सूज सुद्धा असते. तेव्हा याकडेही व्यवस्थित लक्ष द्यावे. मासिक पाळीच्या च्या वेळी या बदलाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. वयावर कुणीच काही करू शकत नाही. पण जर तुम्ही व्यायाम आणि योग करत असाल तर काही प्रमाणात तुमचे वय तरुण दिसत असते.

४) धूम्रपान सुद्धा याला जबाबदार आहे. कारण इलेस्टीन फायबर त्वच्यामधली लवचिकता वाढवण्यासाठी जबाबदार असतो. पण कार्सनोजेन त्या लवचिक असलेल्या तंतूंना तोडण्याचे काम करत असतो आणि ते धुम्रपानामुळे होत असते. पण ही समस्या पाश्चिमात्य देशात जास्त आहे.

५) तुमचे वजन वाढेल किंवा एकदम कमी झाले यामुळेही स्तनात बदल होत असतो. वाढलेल्या वजनाचा जास्त परिणाम स्तन ढिल्ले होण्यात होत असतो. विशेषतः चरबीयुक्त खाणे त्यामुळे वरच्या आवरणावर चरबी येऊन जात असते. आणि स्तन खाली यायला लागतात.

६) सूर्याची अतिनील किरणामुळेही स्तनावर परिणाम होत असतो.

याबाबत काही चुकीची मतं – बऱ्याच स्त्रिया स्तनपानाला स्तन खाली येण्याचा दोष देत असतात. हा खूप चुकीचा गैरसमज आहे. स्तनपान ही निसर्गाने दिलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते फक्त दुग्धग्रंथीच्या येण्यामुळे स्तन खाली येतात पण ज्यावेळी स्तनात दूध येणे बंद होते त्यानंतर हळूहळू स्तन पूर्ववत व्हायला लागतात. याबाबत वाटल्यास तुम्ही काही अनुभवी आईचे मत विचारात घेऊ शकतात. त्यामुळे स्तनपानामुळे असे होत असेल हा गैरसमज सोडून द्या.

या पुढच्या लेखात खाली आलेल्या स्तनाला किंवा ढिल्या झालेल्या स्तनावर काय उपाय करता येईल. कोणत्या उपायांनी ढिल्ले स्तन पूर्ववत करता येतील.   

Leave a Reply

%d bloggers like this: