बाळाच्या जन्म झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि मनाला आनंद वाटणारी गोष्ट की, बाळाला आपल्या मनासारखे नाव ठेवायचे आणि ते नाव इतर लोकांनाही आवडायला हवे. आणि बाळाचे नाव ठेवण्यातही गंमत असते. कारण नाव ठेवण्यावेळी पुस्तके घेऊन येणे त्यानंतरही खूप लोकांना विचारणे आणि ह्या गोष्टी व्हायला हव्यात. बाळाचे नाव एकदाच ठेवावे लागते आणि ते कायमस्वरूपी बाळाच्या सोबत असते. त्याची ओळखच त्याचे नाव असते.
एका आईने आम्हाला त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी, बाळाचे नाव सुचवण्यासाठी सांगितले. तर खाली काही मुलांची नावं देत आहोत. आणि तुम्हालाही नावं सुचली किंवा माहिती असतील तर आम्हाला नक्कीच सांगा. जेणेकरून त्या आईची आपण नाव ठेवण्याबाबत थोडीशी मदत करू शकू.
१) ऋदंग / रुदांग

तुम्हाला जर संगीताची आवड असेल तर हे नाव संगीताशी परिचित असलेले नाव आहे.
२) युवान / विहान
आधुनिक नाव ठेवायचे असेल तर हे नावही योग्य ठरेल.
३) याग्निक

हे नाव ऐतिहासिक आहे. तुमची इच्छा असेल की, मुलाचे नाव ऐतिहासिक हवे तर ह्या नावाचा चांगला पर्याय आहे.
४) स्वयंम / तेजम

जर तुम्हाला संस्कृत नाव ठेवण्याची इच्छा असेल तर ह्या दोन्ही नावाचा चांगला पर्याय आहे.
५) अयान / अयन

हे ही सध्या परिचित असलेले आधुनिक नाव आहे.
७) नक्ष / रियांश

८) शब्द

जर तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर हे नाव तुमच्या मुलाला खूप चपखल बसेल कारण त्यालाही नक्कीच पुस्तकांची आवड असेल.
९) शिवांश

हे नाव शिवाचे आहे. जर तुम्हाला शिवाच्या नावावरून नाव ठेवायचे आहे तर इतरही शिवाची नावे आहेत तेही तुम्हाला उत्तम पर्याय आहेत.
१०) आरव
लहान मुलांसाठी सर्वात प्रसिद्ध नाव, आरव म्हणजे ‘शांत आणि सोज्वळ’. हे नाव केवळ आधुनिकच नाही तर भारदस्त अर्थ असलेले सुद्धा आहे जे भारतीय पालकांमध्ये त्याला प्रसिद्ध बनवते.
११) विवान

या नावाचा अर्थ होतो ‘सूर्याचा पहिला किरण’ आणि ह्या नावाची भगवान श्रीकृष्णाच्या नावातही गणती होते. विवान हे एक सुंदर नाव आहे जे स्वतःतच अद्वितीय असून सांगीतिक गुणधर्माचे वहन करते.
ही सर्व नावे आम्हाला अगोदर ह्या वर्षातील टॉप टेन नावे ह्या लेखात आईंनी सुचवली होती. त्याबद्धल त्यांचे आभार. आम्ही आशा करतो ही नावे तुम्हाला पसंत पडतील.