pregnancy-calendar

प्रेगन्सी कॅलेंडरद्वारा गर्भाच्या वाढी बाबत माहिती करून घेऊ. (स्त्री-पुरुष संबंधानंतर) स्त्रीबीज आणि पुरुषाच्या शुक्राणूंचे मिलन झाल्यावर गर्भबीज ३ दिवस प्रवास करत गर्भाशयात रुजते,आणि गर्भधारणा होते. आणि ९ महिने गर्भाची टप्प्या-टप्प्याने वाढ होयला सुरवात होते.

गर्भावस्थेचे ३ प्रमुख टप्पे मानण्यात येतात

१)पहिले त्रैमासिक १ते३ महिने

२) दुसरे त्रैमासिक ३ते ६ महिने

३) तिसरे त्रैमासिक ६ ते ९ महिने 

१) पहिले त्रैमासिक

पहिल्या महिना

त्रैमासिकात गर्भधारणा झाल्याचे समजते मासिकपाळी बंद होते. कोरड्या उलट्या उमासे सुरु होतात. हे तीन महिने तसे नाजूक असतात. या ३ महिन्यात स्त्रीने जपणे गरजेचे असते. जड उचलणे, धावपळ करणे, शारीरिक आणि मानसिक ताण या गोष्टी टाळाव्या. तसेच आहार देखील सकस ठेवावा.

दुसरा महिना

या काळात गर्भ नाळेद्वारे आईशी जोडला जातो. त्यामुळे आईच्या आहाराद्वारे बाळाला पोषण मिळू लागते. या महिन्यात बाळाच्या हृदयाचा विकास होऊ लागतो त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

तिसरा महिना

तिसऱ्या महिन्यात बाळाची हाडे आणि कान याचा विकास होऊ लागतो. याकाळात डोके हा शरीराचा सर्वात मोठा भाग असतो तसेच हिरड्या,स्वरयंत्र,पापण्यांच्या विकास सुरु होतो. बाळाच्या पापण्या ७व्या महिन्यापर्यंत बंद असतात

       या त्रैमासिकात बाळाच्या सर्व मुख्य अवयवाच्या विकास होत असतो त्यामुळे याकाळात जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक असते

२) दुसरे त्रैमासिक

चौथा महिना

या महिन्यात बाळाचा सर्व शाररिक रचना पूर्ण झालेली असते. या महिन्यात पहिल्या तीन महिन्यातील होणार त्रास कमी होतो. उलट्या मळमळ कमी होते आणि. एकदम प्रसन्न दिसू लागते तिची त्वचा देखील नितळ होते. हा महिना गरोदरपणतील स्त्रीच आनंदी महिना मानत येईल.

पाचवा महिना

या महिन्यात गर्भाची लांबी वाढते.त्यामुळे पोटाचा आकार वाढून त्याचा दाब मूत्राशयावर येतो त्यामुळे लघवीला जाणायचे प्रमाण वाढते. तसेच या महिन्यात गर्भाच्या हाता-पायांच्या बोटांचा विकास होऊ लागतो. तसेच भुवया आणि पापण्याचा विकास होईल.

सहावा महिना

या महिन्यात बाळाच्या संवेदना तीव्र होतील या काळात बाळ प्रतिक्रिया द्यायला लागते तसेच या काळात बाळाला खूप आवाज,तीव्र प्रकाश यांची जाणीव होऊ लागेल. याकाळात बाळाचे वजन साधारण १ पौड इतके होते. या महिन्यात पॉट बऱ्यापैकी दिसू लागते. या महिन्यात विविध तपासण्या करण्यात येतील काही महिलांचे या महिन्यात लोहाचे प्रमाण कमी होते. 

तिसरे त्रैमासिक

सातवा महिना

हा महिना तुम्हांला तुमच्या पोटात असणाऱ्या बाळाची जाणीव करून देणारा महिना असतो. या महिन्यात बाळाच्या हालचाली तीव्रतेने जाणवू लागतात. बाळाचा विकास या महिन्यात झपाट्याने होयला सुरवात होते. या काळात बाळाच्या मेंदूची आणि फुफुसाची वाढ तीव्र गतीने होयला लागते. तसेच बाळाला अंगावरील केस म्हणजे लव देखील या महिन्यातच येते.

काही बालके या महिन्यात वेळेपूर्वी जन्माला येतात. त्याची खूप काळजी घ्यावी लागते

आठवा महिना

या महिन्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असते. आता तुमचे बाळ केव्हाही या जगात प्रवेश करू शकते. या काळात बाळाची हालचाल आणि बाळाचे प्रतिसाद तीव्रतेने जाणवतात आणि त्या ओळखीच्या झालेल्या असतात. हा महिना आणि पुढील महिना बाळाची वाट बघायला लावणारा महिना असतो.

नववा महिना

या महिन्यात गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. या महिन्यात कधीही प्रसूती होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणारे टाळावे.तसेच ओटीपोटात दुखणे, कळा येणे, पाण्याची पिशवी फुटणे,अश्या प्रकारचे काही फरक जाणवल्यास त्वरित डॉक्ट्रांशी संपर्क साधणे आवश्यक असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: