ya-goshti-darshavatat-ki-tumche-sasu-sasare-tumchi-kalaji-ghetat

सासू-सासऱ्याशी असणारे नाते हे एकदम छान आणि सिनेमामध्ये दाखवतात तसेच असतील असे नाही, दोन्ही बाजुंनी काहींना काही तक्रारी असणारच  आणि हे जाहीर सत्य आहे. आणि हे दृश्य प्रत्येक कुटूंबानुसार निरनिराळे असते. तसेच हे नाते तसे नाजूक असते. आजकाल बऱ्याच कुटूंबात सासू-सासरे हे त्यांच्या परीने घरातील नवीन सदस्याचे म्हणजेच सुनेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. ते त्याची काळजी कोणत्या कृतींतून दाखवतात हे आपण पाहणार आहोत.

१. तुमच्या आणि तुमच्या पतीच्या भांडणात दोघांची बाजू ऐकून घेतात

ज्यावेळी तुमचे आणि तुमच्या पतीचे वाद-विवाद चालू असतात आणि ज्यावेळी एखादा निर्णय किंवा चूक बरोबरच निकाल तुम्ही त्यांना द्यायला सांगता त्यावेळी ते फक्त मुलाची बाजू ऐकून ना घेता दोघांची बाजू ऐकून घेतात आणि मगच चूक बरोबर निर्णय घेतात. मुलाचे चुकले असले तरी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देतात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला झुकते माप देतात. त्यामुळे तुम्हांला त्याची तुमचयपरती असणारी काळजी दिसून येते..

२.तुमच्या कामाच्या वेळेनुसार जेवणाच्या वेळा बदलतात

जसं जसं वय वाढत जाते तसं तसं जेवण्याच्या वेळा पाळणे गरजेचे असते परंतु तरी तुमच्या कामाच्या वेळेनुसार ते जेवणाच्या वेळा बदलतात. तुम्हांला कामांवर येण्यास उशीर झाला तर तुमच्यासाठी जेवणाचे थांबतात. तुम्हांला जेवण गरम करून देतात. तुम्हांला जर लवकर नाश्ता करण्याची सवय असले तर त्या देखील तुमच्या वेळेनुसार नाश्ता करतात.

३. ज्यावेळी ते बाहेर जातात त्यावेळी तुमच्यासाठी काहीतरी भेट घेऊन येतात 

ज्यावेळी तुमचे सासू-सासरे जेव्हा कुठे बाहेरगावी किंवा कुठे शॉपिंग ला किंवा फिरायला जातात.त्यावेळी तुमच्यासाठी आठवणीने काहीतरी भेट वस्तू घेऊन येतात. तुमच्या साठी त्या ठिकाणची काहीतरी वस्तू आठवण म्हणून घेऊन येतात 

४. तुमच्यावर घरकामाचा ताण येऊ देत नाही

तुम्ही जर काम असले किंवा तुम्ही काम करत नसाल तरी तुमच्यावर घरकामाचा कामच ताण येणार नाही याची काळजी घेतात, आणि जरा तुम्ही ऑफिसला जात असला तर बिलकुल तुमच्यावर घरकामाचा ताण येऊ देत नाही. त्या तुम्हाला स्वतःच्या मुलीसारखं वागवतात.

५. तुमचे नातेवाईक आणि मित्रपरिवार आले तरी त्यांचे स्वागत करतात

तुमचे नातेवाईक आले की तुम्हांला त्यांच्याशी तुम्हांला गप्पा मारायला वेळ मिळवा त्याच्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रणीसाठी चहा-पाणी आणि सगळी व्यवस्था त्या बघतात. आणि तुम्हांला त्यांच्या बरोबर एकटं सोडतात. 

सुरवातीला तुम्हांला काही गोष्ट खटकतील पण हळू हळू तुम्हांला या गोष्टीमुळे त्यांना तुमची किती काळजी आहे  हे जाणवेल.

Leave a Reply

%d bloggers like this: