balacha-janm-asa-hoto

 तुम्ही पहिल्यांदाच आई बनताय तर मग तुमचा उत्साह आणि आनंद अगदी शिगेला पोहचलेला असेल. अगदीच स्वाभाविक आहे. कारण होणारे बाळ खूप आनंदाचा ठेवा घेऊन येणार आहे. अगदी सिझेरियन साठी दवाखान्यात टेबल वर पहुडली असेल तरीही होणाऱ्या वेदना आणि त्रासाचा नव्हे तर बाळाचाच विचार एक आई करत असते.

आम्ही तुम्हाला बाळ आणि त्याच्या जन्माबद्दलच्या अशा ७ गोष्टी सांगणार आहोत ज्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी.

१) बाळाच्या जन्माची तारीख तंतोतंत नसते


तुमच्या बाळाच्या जन्माची तारीख आणि महिना डॉक्टरांनी तुम्हाला नक्कीच सांगितला असेल. तुम्हीही आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत असाल. पण तुम्हाला माहित आहे का फक्त ७ टक्के स्त्रियांची प्रसूती दिलेल्या तारखेला होते. तुमची प्रसूतीही दिलेल्या तारखे पेक्षा उशिरा किंवा आधी झाली तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

२) तात्पूरत्या भूलीनंतर संपूर्ण बधिरता येत नाही


शरीराच्या खालच्या भागात आणि पोटात वेदनांची जाणीव होऊ नये म्हणून तात्पुरती भूल दिली जाते. इंजेक्शन द्वारे पाठीच्या मणक्यात दिल्या जाणाऱ्या या भूलीमुळे तुमच्या संपूर्ण शरीराला प्रसूती वेदना जाणवणारच नाहीत असे नाही. काही स्त्रियांना प्रसूतीदरम्यान पायांत तर काहींना पोटात थोड्या वेदनांचा अनुभव आल्याचे दिसून आले आहे. प्रसूतिकळा अगदीच सहन होत नसतील तरच तात्पुरती भूल घेण्याबद्दल विचार करा.

३)  भूलीमध्ये तुम्ही काहीही खाऊ शकत नाही


तुम्हाला शरीराच्या खालच्या भागात तात्पुरती भूल दिली जाणार असेल किंवा नसेल तरीही प्रसूतीअगोदर रिकाम्या पोटी राहू नका. कारण प्रसूतीच्या कळा आणि वेदना सहन करणे यांत तुमची खूप ऊर्जा कामी येणार असते. तुम्हाला भूल दिली जाणार असेल तर घरून निघताना खाऊनच निघा. दवाखान्यात प्रसूतिकळा चालू असतांना बर्फाचे छोटे तुकडे चघळण्यास दिले जातात पण याने तुमची भूक जाणार नाही.

४) प्रसुतीदरम्यान तुम्हाला मलविसर्जन होऊ शकते


हा एक अप्रिय प्रसंग असतो हे सर्वच स्त्रिया मान्य करतील. तुमच्या बाबतीत ही असे झाले तर संकोच बाळगु नका. डॉक्टर आणि नर्सेसना अशा घटनांची सवय झालेली असते.

५) बाळ बाहेर आल्यानंतरही प्रसूती बाकी असते


बाळ पूर्णपणे बाहेर आल्यानंतरही नाळ बाहेर येण्यासाठी तुम्हाला कळा द्याव्या लागतील. काही वेळेला, वेदना न होता नाळ पटकन बाहेर येते.

६) नवजात बाळाच्या शरीरावर चिकट द्राव असतो


बाळ जन्मल्यानंतर त्याच्या त्वचेवर असणारा चिकट,पांढरा द्राव काही दिवसानंतर आपोआप निघून जातो. याला व्हर्निक्स कॅसिओसा असे म्हणतात ज्यमुळे गर्भात असतांना बाळाच्या त्वचेचे रक्षण होते. ४० आठवड्यां अगोदर जन्मलेल्या बाळांमध्ये हे सामान्यपणे आढळून येते.

७) बाळांच्या पूर्ण शरीरावर केस असतात


काही बाळांच्या दंड, खांदे किंवा पाठीवर ही भरपूर आणि काळे केस असू शकतात. काही दिवसांनंतर या केसांचा रंग फिका होतो .हे सामान्य आणि नैसर्गिक आहे. गोंधळून जाऊ नका.

हा लेख वाचून तुम्हाला नक्कीच नवीन माहिती मिळाली असेल. इतरानाही लेख वाचण्यास सांगा आणि शेयर करा.

Leave a Reply

%d bloggers like this: