dhilya-stanan-kara-bay-bay

या समस्येसाठी सगळ्यात सोपा आणि खात्रीशीर उपाय म्हणजे व्यायाम. हो कारण ह्यांच्यामुळे शरीरावर परिणाम होऊन स्तनाचे स्नायू लवचिक होऊन स्तन पूर्ववत होण्यास मदत मिळते. असा व्यायाम करताना एक सपोर्टिव्ह ब्रा घालून घ्या. आणि ह्या व्यायामाचा फ़ायदा तुमच्या इतर शरीरालाही होणार आहे. आणि आपोआप शरीर लवचिक व्हायला लागेल.

१) बेंच प्रेस

ह्या व्यायामासाठी दोन डंबेल्स घ्यावीत. तुमच्या शरीराच्या हॅन्डल करण्यानुसार वजन घेऊ शकतात. पण सुरुवातीला वजन कमीच घ्यावे.

एका चटईवर किंवा बेंचवरती आडवे पडून दोन्ही हातात डंबेल्स घ्यावीत त्यानंतर तुमचे डंबेल्स घेतलेले हात खांद्यापासून लांब घ्यावेत आणि तेच हात छातीजवळ परत आणावेत. हीच क्रिया पुन्हा -पुन्हा करावी. खूप साधा व हलका व्यायाम प्रकार आहे. ही क्रिया दररोज नियमितपणे करत राहावी. तुम्हाला फरक लवकरच दिसून येईल.

२) डंबेल्स फ्लाय

हा प्रकारही बेंच प्रेस सारखाच आहे. पण ह्या वेळेला, हात छातीकडे घेण्याऐवजी छातीच्या वरच्या दिशेने घेऊन जा. त्यासाठी हातात डंबेल्स घेऊन चटईवर झोपून घ्या. आणि शक्य झाल्यास गुडघे वाकवू शकतात. म्हणजे तुम्हाला सोयीस्कर करता येईल. त्यानंतर हातात डंबेल्स घेऊन कोपरा वाकवून ९० अंशाचा कोण करून खालच्या बाजूने हात वरती घ्या. ही क्रिया तुम्हाला सुरुवातीला जड जाईल पण हळूहळू सवय होईल. लवकरच तुम्हाला याचा फायदा होताना दिसेल.

३) चेस्ट पास

ही क्रिया खूप मनोरंजक आहे, ह्या क्रियेचा परिणामही चांगला होतो. क्रिया करण्यासाठी, तुमच्या बाळाचा रबरचा चेंडू घेऊन चटईवर निजून घ्या, पाठ ताठ ठेवा, एकत्रितरित्या दोन्ही हातात चेंडू घेऊन तो हात छातीवर ठेवा आणि त्या चेंडूला वरच्या दिशेने फेका ( खूप वर फेकू नका ) आणि वर गेलेल्या चेंडू हात ताठ ठेवून कॅच घ्या. हा प्रकार कठीण आहे पण सवयीने येईल. पुन्हा तसाच छातीवर चेंडू घेऊन परत तशीच क्रिया करा. दररोज दिवसातून १० वेळा करा.

ह्या व्यायामाच्या क्रिया केल्यानंतर
४) बर्फाचा मसाज

२ बर्फाचे तुकडे घ्यायचे आणि त्या बर्फाला गोलाकार दिशेने स्तनावर फिरवायचे आणि बर्फ फिरवताना १ मिनटं पेक्षा जास्त फिरवू नका. त्यानंतर टॉवेलने पुसून फिट ब्रा घाला. ह्या बर्फ फिरवल्याने स्तनाचे टिश्यू पुन्हा ताजेतवाने होऊन स्तन लवचिक होतात. १ मिनटं पेक्षा जास्त वेळ बर्फ फिरवू नका.

५) ऑलिव्ह तेल

हातावर ऑलिव्ह तेल घेऊन स्तनावर हळूहळू १५ मिनिटांपर्यत लावा. आणि असे केल्यामुळे स्तनाच्या पेशी जागृत होतात आणि सेल ह्या दुरुस्त होऊन स्तनाच्या पेशी लवचिक व्हायला लागतात. ह्या गोष्टी नियमित करायल्या पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला हवा असणारा बदल दिसून येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: