garbhvasthet-ghadanarya-goshti

मानवी शरीर समजून घेणे ही शब्दशः एक विचित्र गोष्ट आहे ज्याच्या अंतर्गत खरोखरच कितीतरी गोष्टी घडत असतात. बाळ गर्भात मूत्र विसर्जन करते आणि तेच मूत्र पिऊन घेते. याचप्रकारे ज्या गोष्टी गरोदरपणात घडतात त्या कोणत्या त्या खाली दिलेल्या गोष्टीतून समजून येईल. आपण आपल्या पोटामध्ये एक मानवी जीव वाढवतो आहे हे अनुभवणे खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे.

१) कुत्रा, ससा, डुक्कर व्हेल आणि मनुष्य – या सर्वांची एकाच आकाराची म्हणजे सुमारे 0.2 मिमी लाबीची डिंभ असते. जी खरोखरच अद्भुत गोष्ट आहे.

२) जर तुमची उंची अधिक असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल, तर तुम्ही जुळे किवा अधिक बाळांना जन्म देण्याची शक्यता आहे.

३)  आपल्या बाळाला आपल्या गर्भाशयात भितीही वाटू शकते. 23 आठवड्यांच्या विकासाच्या टप्प्यात, बाळ अचानक विचित्र जोरदार आवाज, आईचे शिंकणे, दरवाज्याचे आपटणे यासारख्या गोष्टींनी बाळ गर्भाशयात घाबरून जाते. 

४) बाळाच्या वडीलांमध्ये सुद्धा गर्भधारणेची लक्षणे दिसू शकतात. ते त्यांच्या शरीरातून बाळाला जन्म तर देणार नाही. पण वजन वाढणे, सकाळच्या वेळेस अशक्तपणा, कदाचीत ओटीपोटातील स्नायूमध्ये पेटका(वेदना होणे) येणे अशी लक्षणे येवू शकतात.

५) अशीही दंतकथा आहे की, छातीतील जळजळी ने ग्रस्त झालेल्या गरोदर स्त्रिया, केसाळ डोके असणार्‍या बाळांना जन्म देतात.

६) आपण जेंव्हा गर्भवती असता तेंव्हा आपल्या हृदयाचा आकार, लांबी आणि रुंदीमध्ये वाढ होत असते. आपल्या शरीरातील जवनिकांच्या भित्तिका जाड होतात त्यामुळे आपण त्याद्वारे आपल्या बाळासाठी पुरेसे रक्त पोहोचवू शकतो.

७) गर्भाशयात असताना, शिशु कन्या आधीच प्रजोत्पादन डिंभ विकसित करतात, जी त्यांना नंतर वापरण्याची आवश्यकता असते. आणि शिशु मुलांमध्ये तारुण्यातच शुक्राणू तयार व्हायला लागतात.

८) आईस्क्रीम बरोबर लोणचे खाण्याची इच्छा होणे अशा विचित्र गोष्टी डोहाळे लागल्यावर वाटू लागतात. जर आपल्याला कधीही लोखंडी रॉड चघळण्याची इच्छा होत असेल किंवा अचानक माती खाणे आवडू लागले तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात काही पोषक तत्वांचा अभाव आहे.

९) आपण गर्भवती असताना चांगल्या, सकारात्मक आणि आनंदी गोष्टी ऐकणे आवश्यक आहे. याचे कारण असे आहे की आपल्या बाळाच्या कानांची निर्मिती होत असते आणि गर्भधारणेच्या दरम्यान पूर्णतः कार्यरत होण्याच्या प्रक्रियेत असतात. गर्भाशयातील द्रवामुळे श्रवणक्षमता अवरोधित होत असली तरी बाळ ऐकू शकते.

Leave a Reply

%d bloggers like this: