jodidaravar-prem

 

वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि प्रणय जुने होत नसते. कुण्याच्यातरी प्रेमात असण्याची फक्त भावनाच तुम्हाला चिरतरुण असल्याची जाणीव करून देते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर प्रेम टिकवून ठेवण्यासाठी त्याचा दिखावा करण्याची काहीही गरज नाही. रोज प्रेमाची अनुभूती देणारे काही क्षण पुरेसे असतात तुमच्या प्रणयातील टिकवून ठेवण्यासाठी. हे अगदी खरे आहे छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठी जादू घडवून आणतात.

चला तर मग पाहूया असेच काही प्रेमसंकेत जे रोजच्या आयुष्यात तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आणि प्रेम फुलवण्यासाठी मदत करतील.

१) छोट्या छोट्या मदतीने जोडीदाराला खुश करा

        समजा, तुमच्या जोडीदाराला एका उद्या एका महत्वाच्या मीटिंगसाठी उद्या लवकर निघायचे आहे किंवा अगदी पहाटे विमानाने/रेल्वेने निघायचे आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल, थोडे उठून त्याच्यासाठी काहीतरी गरमागरम नाश्ता सोबत द्या किंवा लगेचच खायला द्या. जर त्याला ऑफिसमधून येऊन पार्लरला जायला वेळ नसेल तर तुम्ही स्वतः मसाज करून त्याचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न्य करा.

२) प्रेमाने लिहिलेली चिट्ठी

तुम्ही कामावर वेळेत पोहचावे म्हणून त्याने तुमच्यासाठी लवकर उठून नाश्ता बनवून दिला. यातून त्यांचे तुमच्यावर असलेले प्रेम दिसून येते. याबदल्यात आभार मानणारी चिट्ठी लिहून ठेवा. ”नाश्ता खूप छान झाला होता, धन्यवाद ” प्रेमाने ओथंबलेली अशी चिट्ठी सहजच केव्हाही त्यांच्यासाठी लिहून ठेवा. तुमचा जोडीदार आजारी असल्यामुळे कुठेही जाऊ शकत नाहीये तर त्याला प्रसन्न वाटेल असे काही गोड संदेश थोडक्यात लिहा. अशा छोट्या -छोट्या आठवणी त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील.

३) जोडीदाराचे लाडाचे नाव ठेवा

तुमच्या जोडीदाराचे काहीतरी लाडिक टोपण नाव ठेवा. एक सर्वांदेखत हाक मारता येईल असे आणि दुसरे जेव्हा फक्त तुम्ही दोघे असाल तेव्हा गमतीने, लाडिकपणाने बोलावता येईल असे.

४) जोडीदारासाठी प्रेम संदेश पाठवा

कामाच्या धांदलीत असतांना जोडीदाराचा प्रेमाने भरलेला संदेश तुमचे मन प्रफुल्लीत करेल. तुमच्या आवाजात गोड संदेश त्यांना व्हाट्सअप करा. तुम्ही दोघेही व्हाट्स ऍप् वापरात नसाल तर त्यांच्या फोनवर प्रेमसंदेश रेकॉर्ड करा आणि ध्वनी संदेश तपासण्याचा अलार्म लावून ठेवा. त्यांना अचानकपणे मिळालेला हा संदेश आश्चर्यचकित करून सोडेल.

५) खास छायाचित्र घ्या

तुम्ही रोज अनेक गोष्टी एकत्र करत असाल. जेवण, झोपणे किंवा दात घासणे. या सर्व क्षणांची छायाचित्रे काढा. हे फक्त तुमच्या दोघांचे गोड गुपित असेल. या हलक्या फुलक्या क्षणांतून तुमच्यात जवळीक निर्माण होईल आणि रोजची कंटाळवाणी कामे तुम्ही उत्साहाने करायला लागाल.

६) जोडीदारासोबत लंच डेटला जा

तुमच्या जोडीदारासोबत दुपारच्या खास जेवणासाठी तुम्ही घरीच बेत बनवू शकता. स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही जेवण बाहेरूनही मागवू शकता.

७) मोठ्या मनाची व्यक्ती बना

अगदी क्षुल्लक आणि निरर्थक कारणांवरून जोडप्यांमध्ये वाद होतात. तुमचे डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि भांडण लगेचच विसरा.

८) त्यांना मिश्किल संदेश पाठवा

तुमच्या जोडीदाराला विनोदी, मिश्किल संदेश पाठवा. तुम्ही दिवसभरात त्याच्या बद्दल विचार करताय हे पाहून त्याला आनंद होईल आणि नेहमीच्या त्याच – त्या वाणसामान आणि मुलांबद्दलच्या गप्पांमधून तुम्हाला वेगळेपणा मिळेल.

९) त्यांना अप्रत्यक्षपणे दाद द्या

तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी जोडीदाराचे मन जिंकणे खूपच सोपे असते. खासकरून तुमच्या मित्रमंडळींमध्ये त्यांचे दिसणे, त्यांच्या हातचा चवदार स्वयंपाकाचे तोंडभरून कौतुक करा. तुमचे हे वागणे त्यांना नक्कीच आवडेल.

१०) तुमच्या जोडीदाराचा हात हातात घ्या

जोडीदाराचा हात हातात घेण्याची कोणतीही संधी सोडू नका मग ते रस्ता ओलांडताना असो, हॉटेल मध्ये बसलेले असतांना किंवा किंवा गुलाबी थंडीत फेरफटका मारतांना. जोडीदाराला प्रेमाने स्पर्श करणे आणि हात हातात घेणे यातून विश्वास, आदर, सुरक्षितता व्यक्त होत असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: