प्रीक्लॅम्पसिया हा विकार केवळ गर्भावस्थेच्या शेवटी होत असतो. ही मुळातच एक गर्भधारणा व्याधी आहे, ज्यामध्ये उच्च रक्तदाबाची सुरूवात आणि मूत्रा मध्ये लक्षणीय प्रथिने आढळून येतात. प्रीक्लॅम्पसियाला कधीकधी विषबाधा म्हणूनही संबोधले जाते. जर स्थिती अधिक बिघडली तर गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या बाळांना हानिकारक ठरु शकते. त्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रीक्लॅम्पसिया हा विकार झाला आहे हे समजून येणे फार अवघड आणि काहीसे जटिल आहे, तरीपण प्रीक्लॅम्पसियाची काही लक्षण आहेत. आणि लक्षणे आढळल्यावर तुम्ही डॉक्टरांना भेटा.

१) शरीरात असलेली फ्लूइड्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन वजन खूप वेगाने वाढायला लागते.
२) एडिमामध्ये (विशेषत: हात- पाय किंवा चेहऱ्यावर असामान्य सूज) अशी लक्षणे आढळली तर डॉक्टरांना त्वरित कळवावे. आणि ह्या गोष्टी प्रीक्लॅम्पिसियाच्या सुरूवातीच्या लक्षणांमुळे होऊ शकतात.
३) डोके आणि ओटीपोटात वेदना हे देखील याचे प्रत्यक्ष लक्षण आहे. प्रीक्लॅम्पसियामुळे मूत्रमार्गात समस्या, चक्कर येणे, खूप उलट्या होणे. आणि मळमळ ह्या सारख्या समस्या उद्भवू शकतात.
४) अधिक तीव्र लक्षणांमध्ये दृष्टी अंधुक होणे, दोन-दोनदा दिसायला लागणे, तात्पुरता दृष्टीदोष आणि श्वसनमार्गात अडथळा देखील पाहण्यात येतो.
अशी लक्षणे जर तुम्हाला आढळून आली तर तुम्ही त्यासाठी डॉक्टरांना भेटायला हवे कारण प्रकृती जास्त खराब होऊ शकते. त्यासाठी तुम्ही खाली दिलेला उपचार करू शकतात.
उपचार
प्रीक्लॅम्पसियावर कोणताही इलाज नाही कारण रक्तदाबामध्ये होणारा बदल यासंबधी बऱ्याच गोष्टींशी संबंधित आहे. तरी तुम्ही रक्तदाब नियंत्रित राहील याची खबरदारी घ्या. साधारणपणे बाळाचा जन्म होईपर्यंत आपल्याला परिणामस्वरूप होणारा एक्लॅम्पसिया टाळण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.