strech-mark-varti-khajevar-upay

काही स्त्रियांची डिलिव्हरी झाल्यानंतर स्ट्रेच मार्कच्या जागेवर खूप खाज सुटत असते. आणि त्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ आणि त्रासही होत असतो. आणि खूप स्त्रियांना ही समस्या असते. पण ते याविषयी जास्त कुणाकडे बोलत नाहीत. आणि या लेखामधून तुम्हाला त्याची कारणे, लक्षणे आणि उपायांविषयी सांगणार आहोत.

१) स्ट्रेच मार्क मध्ये खाज का येते ?

स्ट्रेच मार्कच्या जागी जे छोटे -छोटे दाणे निघत असतात त्याला polymorphic eruption of pregnancy (PEP) असे म्हटले जाते. आणि हे शरीराच्या बाकीच्या भागातही पसरू शकतो. जसे की, योनीच्या आजूबाजूला, पाठीवर, स्तनावर आणि हातावर. आणि ह्यामुळे खूप काही समस्या किंवा रोगही नाही पण तुम्ही अस्वस्थ होतात.

२) PEP केव्हा होत असते ?

PEP गर्भावस्थेच्या शेवटच्या क्षणी होत असते. काही वेळा बाळाच्या जन्मानंतरही PEP होत असते. खाज स्ट्रेच मार्कच्या जागेवर किंवा पोटावरही होऊ शकते.

३) PEP होण्याचे मुख्य लक्षणे ?

१. तुमच्या त्वचेवर रेखा / रैश उमटतात.

२. त्वचेवर लाल छोटे दाणे येतात.

३. काही वेळा त्वचावर फोड निघायला लागतात. त्या भागाला स्पर्श केल्यानंतर त्यातून पाणीही निघू शकते.

यावरती त्वचा तज्ञ् ला दाखवावे लागेल. आणि त्यांना काही जास्तच वाटले तर ते त्यातील द्रवाचा सॅम्पल घेऊन चेक करतील आणि आवश्यकता भासल्यास रक्ताची सुद्धा चाचणी करतील.

PEP चे कारण

आतपर्यंत PEP चे कारण काही सापडले नाहीये. पण असे मानतात की, त्वचा चा भाग जास्त खेचला गेल्यामुळे असे होत असेल. आणि ज्या मातांना जुळे होतात त्यांच्याबाबत असे जास्त घडून येते.

PEP वरती उपाय कसा करता येईल

खाज तर प्रसूतींनंतर काही दिवसांनी चालली जाते. आणि बाळाच्या जन्म झाल्यानंतर खाज बंद च व्हायला हवी. जर झाली नाही तर खाली दिलेले उपाय तुम्ही करू शकतात.

१. थंड पाण्याने अंघोळ करावी.

२. ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्कची खून असतील त्या ठिकाणी मॉइस्चरायझर क्रीम लावावे.

३. खोबऱ्याच्या तेलाने रात्री मालिश करावी.

४. जोपर्यंत खाज आहे तोपर्यंत सुटी कपडे घालावीत.

५. त्या जागेवर जास्त खाजवू नये. नाहीतर आणखी वाढेल.

६. परफ्यूम किंवा दुसरे कोणतेच पावडर लावू नका.

७. जर तुम्हाला त्या जागेवर जास्तच खाज सुटत असेल तर डॉक्टर स्टेरायड किंवा अँटिहिस्टॅमिनिक क्रीम लावायला देतील.

८. जर क्रीम चा फरक पडत नसेल तर स्टेरायड चे औषध घ्यावे लागेल. पण घेण्या अगोदर डॉक्टरांना विचारून घ्या.

९. आणि महत्वाची गोष्ट ही क्रीम स्तनपान दिल्यानंतर लावावी. स्तनपानाच्या अगोदर ही क्रीम लावू नका.

ह्या उपायांनी जर फरक पडत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: