या गोष्टींच्या आधारे लहान मुलांतील लठ्ठपणा टाळा.

आजकाल लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे याला बाहेरचे अवाजवी खाणे कोल्ड्रिंक्स पिणे. खाण्याच्या योग्य वेळा नसणे व्यायामाची कमतरता, मैदानी खेळचे घटते प्रमाण अशी अनेक कारणे आहेत. जर लहान मुलांना सुरावतीपासूनच योग्य खाणे व्यायाम आणि खेळ याची सवय लावली तर त्यांच्यातील लठ्ठपणा टाळता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे पुढे भविष्यात लठ्ठ होण्यापासून टाळणे शक्य आहे. त्यासाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत 

१) मुलांच्या खाण्याच्या आणि झोपेच्या वेळापत्रक ठरवणे. रात्रीचे जेवण जेव्हढे लवकर होईल तेवढे चांगले.

२) रोजच्या आहारात सर्वप्रकाराच्या जीवनसत्वाचा समावेश होईल असे आहाराचे नियोजन करणे. सुरवातीच्या काही वर्षांमध्ये बाहेरचे असा अचर-बचर खायला देऊ नये. सहसा ब्रेड आणि मैद्याचे पदार्थ टाळावे. यामुळे मुलं लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते

३) आहारात कच्च्या भाज्या- काकडी, टोमॅटो,बिट, मुळा याचा समावेश असावा तसेच कडधान्यांचा देखील समावेश आहारात करावा.

४) ऋतुंनुसार आहारात फळांचा समावेश करावा. 

५) मुलांकडून रोजच्या रोज व्यायाम करून घ्यावा. तसेच मैदानी खेळ खेळण्यास उद्युक्त करावे. 

६) अभ्यासाचे आणि अवास्तव अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नये.

७) शिळे तसेच प्रिझर्व फूड टाळावे.

लहान मुलांमधील लठ्ठपणा टाळण्यासाठी वरील काही सोप्या गोष्टींचा अवलंब केला तरी मुल निरोगी होईल तसेच भविष्यत लठ्ठपणा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पासून मुलांचे संरक्षण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल  

Leave a Reply

%d bloggers like this: