नवजात बाळाचे पहिले पाऊल…..

गर्भात बाळाला नऊ महिने सांभाळल्यानंतर आईला बाळाला बघायचे असते, त्याला खाऊ घालायचे म्हणजे खूप स्वप्न असतात तिचे. आणि नवीन आई-वडील सर्वात जास्त सुखी होत असतात.त्यांना त्या नवीन बाळासाठी काय करू आणि काय नको इतके ते दोघेही हरखून गेले असतात. विशेषतः मम्मी (आई) तेव्हा बाळाच्या जन्माच्या सुरुवातीला खूप गोंधळ उडतो कारण दोन्ही नवीन तेव्हा कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही ह्याबाबत काही गोष्टी. इतकी एक्ससाईटमेन्ट असते की, वडिलांना वाटते, बाळाला बघतच रहावे ! कामावर जायचा जीव होत नाही बाळाच्या वडिलांचा. आणि बिचारी आई इतक्या प्रसूतीच्या वेदना असूनही खूप आनंदात असते. अशा प्राणप्रिय बाळासाठी काही गोष्टी.

१) बाळाचे खाणे व पोषण :


ह्याबाबत लक्ष ठेवा की, बाळाला खाण्यामधून काही ऍलर्जी होणार नाही. कारण ह्यावेळी बाळाची रोगप्रतिकार क्षमता नसतेच. तेव्हा आईने तिचा आहार तपासून व स्वच्छ घ्यावा. नवीन तान्ह्याला २ ते ३ तासांत आईने स्तनपान करायला हवे. तशी प्रत्येक बाळाची भूक भिन्न राहील पण बाळाच्या भुकेचा अंदाज घेऊन घ्या.

२) तान्ह्याचे डोकं सांभाळा :


ही गोष्ट नवीन नाही पण जर लहानपणी बाळाचे डोकं चुकीने झटका किंवा काही झालेच तर बाळाला त्याचा त्रास पुढे खूप होतो. कारण त्याचे डोकं ह्या क्षणी खूप नाजूक आणि कोमल असते. आणि त्याला त्रास झालाच तर तो सांगू शकत नाही म्हणून त्याचे डोकं मुलायम उशीवर ठेवा. आणि तान्ह्याला कुणीही हातात घेत असेल तर गोधडी घेऊन हलक्या हाताने डोकं धरून घ्या.

३) तान्ह्याला झोपवणे :


जन्म झाल्यावर तान्हा खूप आईसारखा खूप थकून गेलेला असतो तेव्हा बाळाला वेळेवर झोपवा आणि तान्ह्याच्या झोपेत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या. डासांचा, खूप गरम किंवा खूप थंड असे काहीच होऊ देऊ नका. जर बाळाची झोप चांगली झाली तर बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची पाळी येणार नाही. व खर्चही खूप वाचेल. त्याला १९ ते २० तास झोपू द्या.

४) बाळाची मुठ्ठी :


तान्ह्या बाळाची बोट मुठीत बांधलेली असतात. आणि प्रत्येकाला आवडते बाळाचा हात हातात घेणे आणि बाळही त्याच्या बोटांनी पकडायला बघते. तेव्हा त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होणार नाही याची दक्षता घ्या.

५) तान्ह्याचे हृदय :


काही नवीन पालक व विशेषतः आई बाळाचे हृदय जोरजोराने धडकते तेव्हा खूब घाबरून जाते कधीकधी बाळाचे हृदय १५० बिट्स प्रति मिनिट होते पण खूप घाबरून जाऊ नका. ते नैसर्गिक असते.

६) तान्ह्या बाळाचे रडणे :


तुमचा तान्हा (यात मुलगीही येते) खूप रडत असेल तर बऱ्याचदा बाळाचे वडील खूप ओरडतात कारण त्यांचा जीव कासावीस होतो स्वतःचा जीव इतका जोरजोराने रडतोय. त्यात आईही खूप बैचेन होते. पण ह्या वेळी बाळाचे रडणे नॉर्मल असते. आणि ते त्याच्या प्रकृतीसाठी चांगलेही असते. कारण त्याची ती एक्सरसाईज असते. आणि ते त्याचे व्यक्त होणे असते.

म्हणून नव्या बाळासाठी खूप घाबरून जाऊ नका. असेच जर तुमचे पहिल्या व नवीन बाळाचे काही अनुभव असतील तर आमच्याशी शेअर करा. ज्यामध्ये तुम्ही खूप घाबरलात, काही फसगत झाली, असे कोणतेही अनुभव.  जर तुमची परवानगी असेल तर आम्ही ते तुमच्या नावानिशी टाईनीस्टेप मराठी वर शेअर करू. 

Leave a Reply

%d bloggers like this: