बाळ जन्मल्यानंतर होणारा रक्तस्त्राव ….

       प्रसूती झाल्यानंतर मातेला समजून येत नाही की, बाळाला जन्म दिल्यावर शरीरात असा काय बदल होतो त्यामुळे खूप रक्तस्त्राव (ब्लीडिंग) होत असते. पण ह्या गोष्टी ज्यावेळी बाळाचा जन्म होतो त्यावेळी शरीरात परिवर्तन होत असते. त्यामुळे योनीतुन रक्त निघत असेल जसे मासिक पाळीच्या वेळी रक्त निघते तसे. बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवस असे रक्त निघत असते कारण बाळासाठी जितक्या रक्ताची आवश्यकता असते आणि जितके टिश्यू आवश्यक असतात ते सर्व पूर्ण झाल्यावर उरलेले जे जास्तीचे रक्त असते. ते ह्यावेळी शरीरातून निघत असते. म्हणून ह्याबाबत खूप घाबरूही नका.

१) हा रक्तस्त्राव किती दिवसपर्यंत चालू राहतो ? आणि रक्ताचे नॉर्मल प्रमाण काय ?

बाळाचा जन्म झाल्यावर रक्तस्त्राव थांबण्यात २० ते ३० दिवस लागतात किंवा त्यापेक्षा कमीही लागतील कारण हे त्या स्त्रीच्या गर्भाशयावर अवलंबून आहे. आणि जर खूपच रक्तस्त्राव होत असेल आणि त्यामुळे अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी बोलून घ्या.

२) जर तुम्ही ह्यावेळी पहिल्यांदा आई होत असाल तर तुमचे रक्त गडद लाल आणि घट्ट असेल कारण तुमच्या बाळाच्या जन्मानंतरचा टिश्यू राहील. आणि जसेही हळूहळू दिवस जातील तसे ते रक्त तपकिरी आणि ऑरेंज होत जाईल. ह्यावेळी तुम्ही पॅडची मदत होईल. पण रक्त खूप निघेल तेव्हा २ पॅडचा वापर करा नाहीतर कापडयांना रक्त लागेल. आणि जास्तच निघत असेल तर डॉक्टरांना भेटा कारण काही स्त्रियांना ह्यावेळी ताप आणि खूप घाम येतो.

३) ह्यावेळी रक्त निघत असते ही गोष्ट सामान्य आहे. पण काही स्त्रियांची प्रकृती जर कमकुवत असेल तर त्यांना ह्या रक्त निघण्याच्या वेळी खूप त्रास होतो आणि काहींना सहन न झाल्याने जीवही जातो. तेव्हा गरोदरपणात रक्ताचे प्रमाण वाढेल असाच आहार घ्या. जेणेकरून ऐन प्रसूतीच्या वेळी तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. आणि प्रसूती सुखरूप होईल.

तुमची प्रसूती सुखरूप होणे हाच आमचा उद्देश आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: