ही ५ फळे तुमच्या शरीरातील लोहाची पातळी वाढवू शकतात

शरीरातील लोहाची कमतरता हा जगभरातील समस्या होऊ लागली आहे. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये ऍनिमिया (रक्तक्षय) ही प्रमुख समस्या आहे.

लोहाचे प्रमाण कमी झाल्याचं एक लक्षण म्हणजे सतत जाणवणारा थकवा. लोहाचे योग्य प्रमाण हे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी राखण्याचे कार्य करते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण आवश्यक असते. पर्यायाने लोहाचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. लोहची कमतरता आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या पातळीवर परिणाम करते , जे शरीरातील पाणी आणि ऑक्सिजनच्या वाहनासाठी जबाबदार असते.

नैसर्गिकरित्या पिकवलेली फळे ही नेहमी आरोग्यासाठी उपयुक्त असतात. तसेच लोहाची समृद्ध स्रोत असतात. जर तुम्हांला कोणते पथ्य चालू नसेल तर काही फळे तुम्हांला नैसर्गिकरित्या लोहाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात अशी फळे कोणती ते आपण पाहणार आहोत. विशेषता शाकाहार घेणाऱ्यासाठी फळं महत्वाची ठरतात

ही लोह समृद्ध फळांचा आहारातील समावेश तुम्हांला उपयुक्त ठरेल

१.अंजीर

ताजे अंजीर आणि वाळलेले अंजीर हे दोन्ही प्रकार पौष्टिक असतात. ताज्या पेक्षा वाळलेले अंजीर जास्त पुष्टी असतात आणि त्यात भरपूर लोह असते. वाळलेले अंजीर रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाल्यास नक्कीच फायदा होतो . ते तसेच अंजिराचा वापर कॉर्न फ्लेक्स, दूध आणि आइस्क्रीम, केक आणि कुकीज् तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो .

. खजूर

या गोड फळांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. आणि हे सहज उपलब्ध देखील होते . तसेच हे फळ मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे आणि पौष्टिकतेचा स्रोत आहे .प्रत्येक २५०ग्रा  खजुरामध्ये 3 mg आयरन असते. आणि खजुराची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हे फळ दुधाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तसेच त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. उदा -खजूर पोळी ,बर्फी, हलवा इत्यादी.

३. बेदाणे

हे प्रत्येकाचे आवडते आहे! हे फळ लोह आणि ग्लुकोजने अत्यंत समृद्ध असते. ते वाळलेल्या द्राक्षापासून बनवलेले असते. प्रत्येक अर्धा कप मनुकामध्ये 1.6 एमजी लोह असते आणि हे सहजपणे खाता येते आणि अधिक रक्त तयार करण्यास मदत करते. ते नुसतेच खाता येते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थमध्ये जसे करी, पुरी हलवा इत्यादीमध्ये देखील घालतात.

४. जर्दाळू

हे फळ प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन ए सारख्या पोषक द्रव्यांने समृद्ध असते. वाळलेले जर्दाळू हे लोहाने समृद्ध असतात ते जास्त काळ ताजे राहातात आणि अनेक महिने साठवून ठेवता येतात. ग्रीष्मामध्ये उपलब्ध असलेल्या हे फळ ताजे असताना त्याचे सॅलड किंवा इतर मिठाई तसेच आइस्क्रीम मध्ये वापरतात.

५. डाळिंब

हे रसाळ, विरहित फळ सर्व रक्त संबंधित आजारांकरिता अत्यंत फायदेशीर आहे. याचे दाणे असेच खाता येतात किंवा कोणत्याही सॅलडमध्य घालता येतात. डाळिंबाचा रस देखील करता येतो. या फळामध्ये लोहाचे प्रमाण असतेच आणि इतर देखील आजारासाठी देखील उपयुक्त ठरते 

Leave a Reply

%d bloggers like this: