या ९ गोष्टी दर्शवतात की आई खरंच किती महान असते

प्रत्येकाच्या जीवनात आई ही खूप खास व्यक्ती असते. ती तुम्हांला नऊ महिने पोटात सांभाळते आणि तुम्ही स्वावलंबी होई पर्यन्त तुमचा सांभाळ करते. त्या हे सगळं कोणत्याही अपेक्षेशिवाय करतात. त्यांचे कुटून करावे तेव्हढे कमी आहे आणि त्याचे कितीही आभार मानले तर कमीच आहे. आई महान का असते या कारणांची यादी करायला घेतली तर ती संपणार नाही पण त्यातली काही प्रमुख १० करणे पुढे देत आहोत. जी दर्शवतात कि आई नेहमी बेस्टच असते

१. ती जगातली निस्वार्थी व्यक्ती असते

विचार करा ९ महिने तुम्हाला पोटात वाढवणं. ते देखील कोणतंही अपेक्षा न ठेवता. तसेच तुम्हाला वाढवताना तिने केलेल्या तडजोड. तुम्हांला काही कमी पडू नये तसे तुम्हांला सर्व सुखसोई मिळाव्या यासाठीची तिची धडपड. तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हांला काही हवं असले तर पहिले आईचीच आठवण येते आणि ती देखील तुमच्यासाठीसगळ्या गोष्टी करायला तयार असते.

२. ती जिवलग मैत्रीण असते

कोणीही आपल्याबाबतीत आईपेक्षा अधिक प्रेमळ आणि संवेदनशील असू शकत नाही. ती गरज असले त्यावेळी तुमच्याशी मैत्रीण सारखं वागते तुमच्या गोष्टी मैत्रीण म्हणून समजून घेते.तुमच्या पडत्या काळात तुम्हाला मानसिक आधार देते. ती तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेते आणि कोणताही पूर्वग्रह ना ठेवत तुम्हांला योग्य सल्ला देते जे तिच्या शिवाय कोणी देऊ शकत नाही

३. ती एक प्रेरणा असते

तुम्ही विचार करू शकणार नाही अश्या गोष्टी ती घरासाठी आणि तुमच्यासाठी करत असते. आणि तिचे असे हे वागणे आयुष्यतील प्रत्येक वळणावर तुम्हांला प्रेरणादायी ठरत असते. तिची क्षमता, प्रेम लोकांना पद्धत नेहमीच प्रेरणादायी असते.

४. तिचे तुमच्यावर निस्वार्थी प्रेम असते

आयुष्यात लोक येतात-जातात पण आई ही एकाच व्यक्ती असते जी कायम तुमच्या बरोबर आणि पाठीशी ठाम असते. इतर नात्यासारखं तिचे तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही.

५.  ती कायम तुमच्या पाठीशी असते 

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ-उतारात ती तुमच्या पाठीशी असते. ती आयुष्यतील प्रत्येक टप्प्यावर तुम्हांला सपोर्ट करते. तसेच तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी कायम प्रोत्सहान देत असते.

६.ती तुमची पहिली शिक्षक असते.

पाहिलं पाऊल उचलायला पहिला शब्द उच्चारायला तीच शिकवते. तसेच जसे जसे मोठे होत जाता तसं तसं ती तुम्हांला आयुष्याचे धडे देते. तुमच्या चुका दाखवून त्या कश्या सुधारू शकतो याचे मार्गदर्शन करते. तुमची चूक तुमच्या लक्षात आणून देताना कसली भीड-भाड बापाला नाही.

७. ती तुम्हांला योग्य रास्ता दाखवते

तुमची आई तुम्हांला नेहमी तुमच्यासाठी काय चांगले आहे हे सांगण्याच्या प्रयत्न करते. आणि तुम्हांला आयुष्यात योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता किंवा तिच्या अनुभवातून. बिघडलेल्या गोष्टी कश्या व्यवस्थित करायच्या हे देखील ती तुम्हांला शिकवते

८. ती तुमच्या चेहऱ्यावर हसू आणते

ज्यावेळी तुमचा मूड खराब असतो तुम्ही कोणत्या चिंतेत असता त्यावेळी ती विनोद करून तुम्हांला हसवते. जरी तिचे विनोद फार विनोदी नसले तरी ते तुम्हांला हसवतात. तुमच्यासाठी ती लहान बनते आणि बालिशपणे वागते तुम्हांला हसायला यावं, तुमचा मूड ठीक व्हवा यासाठी ती वाट्टेल ते करायला तयार असते.

९. आईची मिठी

तुम्ही किती दिवसाने आईला भेटत आहात ही गोष्ट महत्वाची नसते,पण ज्यावेळी तुम्ही तिला भेटता त्यावेळी तिची मिठी तुम्हांला कायम धीर देणारी आणि आश्वासक असते.

खरं सांगायचं तर आया या किती अप्रतिम असतात हे शब्दात सांगणं कठीणच असते. तरी त्या किती महान असतात आणि त्या तुमच्यासाठी काय-काय करतात हे सांगून आभार मानायचा छोटासा प्रयत्न. तुम्हांला देखील या गोष्टी नक्कीच पटतील. 

Leave a Reply

%d bloggers like this: