गरोदर असतानाच पुन्हा दिवस जाऊ शकतात का ?

 

प्रत्येक गर्भारपण वेगळं असतं  अगदी तुम्ही पहिल्यांदा गरोदर असतानाची परिस्थिती आणि तुम्ही दुसऱ्यांदा  गर्भार असतानाची परिस्थिती या दोन्ही परिस्थिती मध्ये फरक असतो. कधी-कधी गरोदरपणाच्या बाबतीत महिलांच्या मनात अनेक विचार येत असतात. त्यामधला एक म्हणजे आपण गरोदर असतानाचा पुन्हा दिवस जाऊ शकतात का ?

थोडा विचित्र वाटणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो आहे. आणि ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे.

ह्यूमन सुपरफीटेशन(human superfetation)

सुपरफीटेशन हे (विविध ओवुलेशनमुळे होते)  हा एका असा प्रकार आहे ज्यामध्ये गर्भ असताना देखील दुसरा गर्भ तयार  होतो. हा प्रकार बहुतांशी प्राण्यामध्ये आढळतो. मनुष्यप्राण्यात म्हणजेच स्त्रीच्या बाबतीत हा प्रकार फार क्वचित आढळतो. 

हे कसे शक्य होते

जर एखादी स्त्री गर्भवती आहे आणि त्यावेळी देखील दुसऱ्यांदा ओव्हुलेशन करण्याची  म्हणजेच सोडण्याची क्षमता तिच्या शरीराची असले तर हे घडू शकतं. गर्भधारणेची प्रक्रिया सुरु असताना या प्रक्रियेत काही प्राक्रियांना झालेला विलंब हे देखील याचे कारण असू शकते. खरं तर गर्भार झाल्यावर ओव्हुलेशन होऊ नये म्हणून एक संप्रेरक (हार्मोन) काम करते त्यामुळे गाभारा असताना पुन्हा दिवस जाणे हे अशक्य असते. परंतु सुपरफिटीशन का होतं कश्यामुळे होतं हे पूर्णतः सिद्ध झालेले नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: