जोडीदाराचा वैवाहिक जीवनातील रस कमी का झाला आहे जाणून घ्या.

काही स्त्रियांची व पुरुषांचीही एक समस्या असते आणि ती त्यांना कोणासमोरच सांगता येत नाही. आणि त्यांना सांगण्याची खूप शरम वाटते. आणि त्यांना वाटत असते की, असे सांगितल्यावर आपले हसे होईल. पण आम्ही त्याच गोष्टीविषयी आज सांगणार आहोत. तर काही स्त्रियांना लैंगिक जीवनाविषयी रस नसतो. आणि त्यामुळे त्यांचे पारिवारिक जीवन थोडे तणावाचे होते. तेव्हा ह्याविषयी बोलायला हवेच आणि एका स्त्रीने या ह्या विषयी सांगितले आहे. तेव्हा खाली काही कारणे देत आहोत त्यामुळे स्त्रीला लैंगिक सुखात रस नसतो.

१) ह्या स्त्रियांना लैंगिक दृष्ट्रा बिलकुल उत्तेजित होत नाहीत. आणि जर थोड्याफार प्रमाणात लैंगिक उत्तेजित झाल्याचं पण त्यांना समागमा(सेक्स) चा उत्कटबिंदू गाठता येत नाही. आणि त्या समागमात काहीच रस वाटत नाही. आणि जर काहींना ह्यामुळे असे वाटते की, आपण लैंगिक जीवनात अपयशी ठरतोय आणि त्यात आपली खूप चूक असेल.

२) काही स्त्रिया ह्या अशा स्वभावाच्या असतात की, त्यांची भावनात्मक चिन्हे ही गोठून गेली असतात आणि त्यांना समागम आवडत नसते. असा स्त्रियांना थंड प्रकृतीच्या आहेत असे म्हटले जाते.

 

हा थंडपणा म्हणजे नेमके काय ?

१. ह्याबाबत हेच खरे असे नाही. जर स्त्रीचे एकदम वजन वाढत आहे ती खूप खात आहे आणि ती लठ्ठ होते. किंवा काही स्त्रियांच्या बाबतीत लहानपणीच अश्या काही गोष्टी घडल्या असतात की त्यामुळे तिला थंडपणा येतो. ती अशात स्वतःच्या शरीर सुंदर व मादक दिसायला हवे ह्यासाठी काहीच करत नाही. तिला पुरुषाचे आकर्षण अजिबात वाटत नाही.

२. ह्याला शारीरिक आणि मानसिक कारणही असतात. हार्मोन्स कमी झाल्यामुळे स्त्रीची लैंगिक सुखाची इच्छा कमी होते. हेच पुरुषांनाही लागू पडते.

३. ह्यात फक्त स्त्रीमध्येच थंडपणा नसतो तर पुरुषातही थंडपणा येतो. पण आपल्याकडे ह्या पुरुषांना नपुसंक किंवा तू मर्द नाहीस असे म्हटले जाते. पुरुषांनाही खूप वेळा समागम करू असे वाटत नाही.

आता ह्या थंडपणाला अनेक कारणे आहेत.

१. दोन्ही स्त्रिया आणि पुरुष ह्यांची जनेंद्रियातील स्नायू शिथिल झाल्यामुळे कमी होते. त्याचे कारण हे त्या भागात मार लागलेला असतो किंवा काही अडथळा निर्माण झालेला असतो. स्त्रियांच्या योनी मार्गात सूज आलेली असते. आणि म्हणून पुरुष आणि स्त्रीची आपोआप ह्याबाबत रस कमी होतो.

२. मज्जातंतूच्या संस्थेतील काही बिघाडामुळेही थंडपणा येतो. कारण येणाऱ्या संवेदना मेंदूकडे न गेल्यास उत्तेजितपणा येत नाही. ह्यात स्त्री किंवा पुरुषाला कामाचा ताण -तणाव असतो. 

३. अपुरे खाणे, व्हिटॅमिन्सची कमतरता व इतर पौष्टिक आहाराची कमतरता ह्यामुळेही.

४. काही स्त्रिया व पुरुष हे विचार करतात की, आपण आपल्या जोडीदाराला उत्कटबिंदूचे सुख देऊ शकत नाही. आणि ह्या विचाराने दोघेही स्वतःच्या लैंगिक जीवनात रस निर्माण करत नाहीत.

५. पुरुष आणि स्त्रिया ह्यात विशेषतः स्त्रियांना समागमाबाबत गुन्हा किंवा काहीतरी पाप करतेय अशी समजूत विकसित झालेली असते. त्यामुळे त्या नैसर्गिकरित्या समागमात रस घेत नाही. कारण त्यांची मानसिकता तशी विकसित झालेली असते.

तेव्हा ह्या थंडपणाला दूर कसे करता येईल. आणि थंडपणा पुरुषांनाही लागू होते पण तेही ह्याबाबत कुणाकडे बोलत नाहीत. पण ह्यामुळे तुमच्या लैंगिक जीवनात अडथळा येऊन संसारात मिठाचा खडा पडतो. ह्या लेखाचा दुसरा भाग लवकरच देऊ आणि त्यात ह्यासंबंधी उपाय सांगू. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: