नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी टाळाल ?

निरोगी जोडप्यामध्ये कोणत्याही निरोधाशिवाय झालेल्या समागमानंतर गर्भधारणा होण्याची तीव्र शक्यता असते. काही कारणास्तव मुल नको असल्यास किंवा सध्या मुल नको असल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी विविध कृत्रिम पर्यायांचा वापर करून गर्भधारणा रोखता येते. परंतु या गर्भनिरोधक साधनाचे थोड्या फार प्रमाणात दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भधारणा टाळण्याचा सर्वात सुरक्षित आणि सोप्पा मार्ग म्हणजे शरीर संबंध टाळणे. पण जर गर्भधारणा टाळण्याचा हा काळ एक किंवा अधिक वर्षाचा असु शकतो त्यामुळे हा उपाय प्रत्यक्षात आणणे अशक्य असते.

परंतु ज्या स्त्रियांना गर्भाशय संदर्भात काही समस्या आहे किंवा कृत्रिम गर्भनिरोधकमुळे काही दुष्परिणामांना तोंड द्यावे लागले असले अश्या स्त्रियांना गर्भधारणा टाळण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतील या उपायांमुळे साधारणतः कोणत्या काळात समागम टाळल्यावर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते ते पाहणार आहोत 

ओव्हुलेशनचा काळ जाणून घ्या

 

साधारणतः मासिक पाळी सुरु झाल्यानंतर १० ते १२दिवसांनी ओव्हुलेशन होत असते त्यावेळी स्त्री गर्भधारणाक्षम होते त्यामुळे या दिवसात समागम टाळावा. प्रत्येक महिलेच्या पाळीची लांबी वेगवेगळी असते आणि (ओव्हुलेशनचा काळ) अंडं येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ओव्हुलेशनचा काळ जाणून घेणे गरजेचे असते. 

योनीतुन स्त्रवणाऱ्या पदार्थाचे निरीक्षण करा

 बहुतांश स्त्रियांना महिन्याच्या बहुतांश काळात योनीतून द्राव स्त्रवत असतो. ही चांगल्या आरोग्याची निशाणी आहे. हा चिकट द्रव त्याचे प्रमाण, सातत्य आणि रंग यांच्यानुसार बदलतो. काहीवेळा तो चिकट आणि पांढुरका असतो आणि इतर वेळी तो बुळबुळीत आणि पारदर्शक असतो. या चिकट पदार्थचे स्वरुप हे मासिक पाळीच्या अवस्थेनुसार बदलते. मासिक पाळीनंतर लगेच हा द्रव कमी प्रमाणात, तुलनेनं कोरडा, घट्ट आणि पांढुरका असतो. जस जसं अंडाशयात अंड जसं पक्व होऊ लागतं आणि बाहेर येण्याचा काळ जवळ यायला लागतो त्यावेळी शरीरात फिरणारा इस्ट्रोजेन हा हार्मोन या द्रवाला पारदर्शक, लांबट आणि बुळबुळीत करतो. अंड बाहेर येत असताना हा चिकटपणा आणि लांबटपणा अधिक असतो आणि त्यानंतर एक दिवसांनी ती स्त्री गर्भधारणेसाठी पूर्णतः तयार असल्याचे चिन्ह असतं. त्यामुळे या दिवसात शरीरसंबंध टाळावे

शरीराच्या तापमानातील बदलांवर लक्ष ठेवा

 स्त्रीनं आपल्या शरीराचं तापमान रोज ठराविक वेळी तपासून पाहावं. प्रत्येक सकाळी लवकर आपल्या शरीराचं जे तापमान असतं त्याला मूलभूत तापमान असं म्हणतात. महिन्याच्या मध्यात, अंडं बाहेर येत असताना हे तापमान लक्षणीयरित्या वाढतं (अंदाजे 1-2 अंशांनी) आणि पुढची पाळी येईतोवर तसंच राहतं. ही पध्दत नेमकेपणानं वापरली तर तापमान वाढण्याच्या आधीच्या पूर्ण काळात लैंगिक संपर्क टाळणे गरजेचं ठरते, हा काळ अंदाजे १ ते १६ दिवसांचा असाव शकतो. एकदा का अंडं बाहेर आलं नंतरचे दोन दिवस हे गर्भधारणाक्षम असतात. त्यामुळं ज्या दिवशी समागम करणं सुरक्षित आहे ते दिवस अगदी थोडे आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: