झोपताना कशी उशी घ्यावी

 चांगली झोप प्रत्येकाला हवी असते. आणि झोप स्त्रियांसाठी खूप महत्वाची आहे. कारण त्यांना दिवसभर बाळाचे, नवऱ्याचे, सासू-सासर्यांचे सर्व घराचे काम करायचे असते. आणि त्यात जर झोप झाली नाही तर त्यांचे कामात चित्त लागत नाही. व आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असतो. म्हणून रात्री शांत झोप होण्यासाठी तुम्ही उशी वापरत असाल तर ह्या ब्लॉगचा तुम्हाला उपयोग होईल.

१) झोपण्यासाठी उशी घ्यावी का ?

ह्यावर जर तुम्हाला उशी घेऊन शांत झोप लागत असेल तर उशी घेऊ नका. पण काहीवेळा उशी घ्यावी लागते कारण झोपताना मन ताठ असेल तर तुमच्या शरीराला ऑक्सिजन योग्य मिळत असते. आणि जर उशी न घेता तुम्ही श्वसन करत असाल तर उशी घेऊ नका. पण अगोदर तपासून घ्या. की, तुम्ही रात्री झोपल्यावर श्वसन व ऑक्सिजन व्यवस्थित घेतात.

२) अयोग्य उशी घेतल्याने ?

जर तुम्ही उशीची निवड करताना खूप मोठी किंवा कडक केली. तर त्यामुळे मानेला व्यवस्थित आधार मिळत नाही ती खाली नाहीतर खूप वरती होते. त्यामुळे श्वसनात अडथळा येऊन तुम्हाला स्लीपअप्निया किंवा तुम्ही घोरायला लागतात. सकाळी उठल्यावर तुमची मान दुखायला लागते, काही व्यक्तींना कायमस्वरूपी मानेची समस्या होऊन जाते.

३) उशी कशी निवडायची ?

उशी घेताना तुमच्या डोक्याचा, मानेचा, आणि तुमच्या सोयीनुसार जो आकार योग्य असेल त्या उशीची निवड करायची. पण उशी खूप जाड नसावी. ती रुंदी अशी असावी की, त्यामुळे तुमची मान दुखणार नाही आणि मान समतल असेल. त्याचबरोबर उशी खूप कडक असू नये. आणि उशी खूप मऊ ही असू नये कारण जर खूप मऊ उशी असेल तर तुमची मान खूप खूप खाली जाऊन आणि मान समतल न झाल्यामुळे झोपेत अडथळा येईल आणि सकाळी मान दुखणार.

४) पोटावर झोपणे योग्य की अयोग्य ?

जर शक्य झालेच तर पोटावर झोप घेऊ नका. कारण त्यामुळे मान व पाठ आणि डोके यात समतोल राहत नाही आणि पोटावरही खूप दाब पडतो. खूप वेळ अशी झोप घेतल्यावर मान, पाठ दुखते. आणि झोप शांत लागत नाही. आणि जर तुम्हाला पोटावर झोपल्याशिवाय झोप लागत नसेल तर तुम्हाला पोटावर दाब पडणार नाही आणि मान व डोकं समतोल राहील याची दक्षता घ्यावी लागेल. आणि हे बऱ्याचदा कठीण आहे.

५) तुम्हाला जर घोरण्याची समस्या असेल तर अँटी-स्नोरिंग उशी घेऊ शकता. कदाचित त्यामुळे थोडाफार आराम मिळून झोप शांत होईल. उशी निवडताना सुटी कापडाची उशी चांगली असते. बाजारात आता खूप प्रमाणात सिथेंटीक आणि नॉयलॉनच्या उशी आल्या आहेत. 

६) झोपताना कुशीवर झोपणे उत्तम आणि पाठीवर झोपणेही उत्तम आहे. कुशीवर झोप घेतल्याने बाकीच्या क्रिया नैसर्गिक होतात आणि तुम्हाला आराम मिळतो.

शेवटी झोप ही तुमची आहे आणि ती कशी घ्यावी ह्याही गोष्टी तुमच्यावर आहेत पण जर काही व्यक्तींना झोपण्याची समस्या असेल तर ह्या गोष्टी करून बघा. आणि जर त्रास होत असेल तर ह्यात बदल करा. आणि झोपेबाबत खूपच समस्या असेल तर डॉक्टरांची भेट घ्या कारण झोप हे खूप मोठे औषध आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: