जाणून घ्या जुळी मुले कशी होतात ?

कधी-कधी गर्भधारणेनंतर अंड्याचे आपोआप दोन भागात विभाजन होते आणि हे दोन्ही भाग गर्भाशयात दोन गर्भ म्हणून विकसित होतात. त्याचा परिणाम त्या स्त्रीला एकाचवेळी दोन बाळ होतात. त्या बाळांना जुळी बाळे म्हणतात

जुळ्या मुलांचे प्रकार

मोनोझायगोटीक (Mono zygotic twins)

अशाप्रकारे झालेल्या या दोन बाळांच्या चेहऱ्यात आणि रुपात साम्य दिसते. त्याची बरीच लक्षणेही समान असतात. ही दोन्ही बालके दोघेही मुलगे व दोघेही मुली असू शकतात. याचे कारण ही दोन्ही बालके एकाच अंडाणूपासून निर्माण होतात.जे एकमेकांसारखे दिसतात. अशा प्रकारच्या बाळांमध्ये सारखेच जेनेटीक कम्पोझिशन असतात.

डायझायगोटीक (Dizygotic twins)

काहीवेळा अशीही एक शक्यता असते की, पुरुषाच्या दोन शुक्राणू अलगपणे एकाच स्त्रीच्या दोन अंडाणूमध्ये प्रवेश करतात. त्यातून गर्भाशयात दोन गर्भ विकसित होऊन ती स्त्री दोन बालकांना जन्म देते. या प्रकाराला डीझायगोटीक ट्विन्स म्हणतात. या प्रकारची दोन मुले एकमेकांहून भिन्न असू शकतात. त्यांचे लिंग समान असू शकते वा भिन्न्ही असू शकते.म्हणजे. या जुळ्यांचा जेनेटीक कम्पोझिशनदेखील एकमेकांपासून भिन्न असतो

जुळी मुले होण्याची करणे 

१) अनुवंशिकता 

तुमच्या घरात पूर्वी कधी  जळ्या मुलांचा जन्म झाला असेल तर अनुवंशिकतेने तुम्हांलाही जुळं होण्याची शक्यता अधिक असते. आणि जर तुम्ही स्वतः जुळ्यांपैकी एक असाल तर तुम्हांलाही जुळं होण्याची शक्यता अत्याधिक असते. यामध्ये वडीलांच्या कुटूंबीयांशी थेट कोणताही संबंध नसतो.  ही गोष्ट आईकडच्या बाजुने अधिक प्रभावी असते.

२. वजन आणि उंची

ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक आहे. मात्र तुमची उंची आणि वजन यावर जुळ्यांचा जन्म आधारित असू शकतो. American College of Obstetrics and Gynaecology मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, 30 किंवा त्यापेक्षा अधिक बीएमआय असणार्‍या स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता अधिक असते. तसेच उंच स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता अधिक असते.

३. वाढत्या वयातील गर्भधारणा

स्त्रीचे वाढते वय हे आई होण्याची शक्यता कमी करत असते. परंतु काही अभ्यासातुन असते आढळले आहे की वाढत्या वयातील गर्भधारणेत जुळी मुले होण्याची शक्यता देखील वाढते मात्र वाढत्या वयानुसार जुळं होण्याची शक्यता वाढते असा निष्कर्ष काही अभ्यासातून पुढे आला आहे.

४ संप्रेरकीय बदल

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या संप्रेरकीय( हार्मोनल) औषधाचा सातत्याने वापर करणाऱ्या स्त्रियांमध्ये या औषधाचा वापर थांबल्यावर नंतर बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांमध्ये होणाऱ्या संप्रेरकीय बदलामुळे देखील जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते.

५. कृत्रिम गर्भधारणा

वरील कारणांनी जुळी मुले होतीलच याबाबत खात्री देता येत नाही परंतु आय व्ही एफ सारख्या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही जुळी मुले प्लॅन करू शकता

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: