बाळाच्या जन्मानंतर नवमातांच्या मनात येणाऱ्या शंका

मुल झाल्यानंतर सुरवातीचे काही नवमातांना विचित्र अनुभव येणारे दिवस असतात तसेच या मनात सतत शंका कुशंका बाळाच्या हालचाली बाळाचे वागणे त्यातील बदल तुम्हाला अस्वस्थ करत असतात या काळात या नवामातांच्या मनात कोणत्या शंका येत असतात

बाळाला दूध पुरते ना?

सुरवातीच्या काळात बाळाला आपण नीट स्तनपान देत आहोत ना? आपल्याला योग्य प्रमाणात दूध येते ना सहा शंका सतत सतावत असतात. तसेच अचानक स्तनातून दूध का पाझरते याबाबत सतत काळजी वाटत असते. बाळाला किती दूध देता ते त्याला पुरते कि नाही हे बाळाचे वजनावर अवलंबून असते. याबाबत वेळोवेळी डॉक्तरांशी संपर्कात राहणे गरजेचे असते.

बाळ कोणासारखं दिसतं ?

सुरवातीच्या काळात बहुतांश बाळांची चेहेरपट्टी कोणासारखी आहे हे तुम्ही शोधात असता आणि बाळची चेहरेपट्टी सतत बदलत राहते. आणि तुम्ही दर दिवशी बाळ तुमच्या सारखं दिसतं की तुमच्या पती सारखं हे तपासत बसता

बाळाची शी-शू ची नक्की वेळ कोणती ?

सुरवातीचे काही दिवस बाळाला कधी शु लागेल आणि कधी शी लागेल याचा काही नेम नसतो त्यामुळे तुम्ही त्यांना नुकतेच पाजून झोपले असले तरी शी करतील झोपून उठले तरी शी करू शकतात याची कोणती वेळ ठरली नसते. हळू-हळू बाळ जसा मोठं होऊ लागतं तसं तसं या वेळा निश्चित व्हायला लागतात. तसेच बाळाच्या शीचे रंग तुम्हांला चक्रावून सोडतील. स्तनपान चालू असताना तुम्ही जे काही खाता त्याचा प्रभाव बाळावर होत असतो.

बाळ सारखच झोपलेले का असते ?

बाळ जन्माला आल्यानंतर सुरवातीचे काही दिवस बराच वेळ झोपण्यात घालवत असते. त्यामुळे ते सारखे झोपते म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. त्याला थोड्या-थोड्या वेळाने उठवून पाजणे गरजेचे असते. त्यातून बाळा उठवल्यानंतर देखील उठत नसेल किंवा पाजायला घेतल्यावर पीत नसेल तर बाळाला डॉक्टरांना दाखवणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते

बाळा का रडते 

बाळ मधूनच अचानक रडायला लागते.. काय करावे सुचत नाही त्यावेळी बाळाला काही टोचत नाही ना काही चावत नाही ना तपासून पहा बाळाला कुठे काही लागले नाही हे बघा. त्यानंतर पोटाला हलकेच हात लावा जर पोट जर रिकामं वाटलं तर त्याला पाजा. आणि एवढं करून थांबलं नाही तर मात्र डॉक्ट्रांना दाखवा

बाळाची कशी अंघोळ घालू?

नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला हॉस्पिटल मध्ये असताना नर्सच अंघोळ किंवा स्पंजींग करते त्यामुळे त्यावेळी काही चिंता नसते, परंतु घरी आल्यावर त्या इवलुश्या बाळाला अंघोळ कशी घालायची याची काळजी वाटते. घरी जाताना बाळाच्या तब्बेतीनुसार याबाबत डॉक्टर आवश्यक त्या सूचना देतील त्या पाळाव्या. तसेच सुरवातीच्या काळात बाळाला अंघोळ घालताना अनुभवी व्यक्ती समोर असली तर ते योग्य ठरेल. तसेच अंघोळ घालताना पाणी अति गरम किंवा अति थंड असाव नये आणि बाळाला अंघोळ घालायचा अंदाज येईपर्यंत बाळाची अंघोळ चालू असताना बरोबर कुणीतरी असल्याशिवाय बाळाला अंघोळ घालू नये. 

Leave a Reply

%d bloggers like this: