सासरी असताना ह्या गोष्टींची खूप आठवण येते

   लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येत असते. आणि तो खूप सुंदर असा अनुभव असतो की ज्यामुळे जीवनात वेगळा रस्ता सुरु होत असतो. पण यासोबतच तुम्हाला तुमचे आई-वडील यांना सोडावे लागते, भावाला कि त्यासोबत असा दिवस नाही की, त्या दिवशी भांडण झाले नसेल. ते घर, कुटुंब, गल्ली, गाव, कॉलनी, आणि तुमच्या मैत्रिणी. अशा कितीतरी आठवणी सोडून तुम्ही नव्या घरात प्रवेश करत असतात. आता जरी तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असतील तरी ह्या आठवणी तुमच्या मनातून जात नाहीत कारण हा असा प्रश्न झाला की, स्त्रीला माहेर का खूप आवडते ? तेव्हा तुम्ही सासरी काय -काय मिस करता ? 

१) कॉलेज साठी मिळणारे गरम जेवण

कॉलेजला जाण्यासाठी आईकडून मिळणारे गरमागरम जेवण आणि तो आईचा हातचा डबा. की, तो डबा खाण्यासाठी कितीतरी मैत्रिणी बरोबरच डबा खाण्याच्या वेळी यायच्या. अशा सर्व आठवणी तुम्हाला नव्या घरी कोण नसताना येत असतात. त्याचबरोबर स्वतः केलेला स्वयंपाक आणि तो कोणीच खाल्ला नव्हता आणि फक्त वडिलांनीच खाल्ला होता कारण त्यांनीच तेव्हा पोरीच्या स्वयंपाकचे कौतुक केले होते.

२) भावासोबतची भांडण

सकाळी सकाळीच बिस्कुटावरून भांडण प्रत्येक गोष्टीत भावाचे नाक खुपसणे मग ते मुलींच्याही गोष्टी असेना. जीन्स पॅन्ट घालण्यावरून घरात भावाने घातलेला वाद आणि त्यात तुमची झालेली सरशी (विजय) अशा खूप गोष्टींना भावाने केलेल्या भांडणी ह्या सर्व गोष्टींची आठवण आणि तोच भाऊ लग्नात तुमच्यासाठी किती माय धोकलून रडला होता.   हे सर्व आठवून तुमच्या डोळ्यात पाणीच आले असेल.

३) आई – एक मैत्रीण

तुमची आई ही तुमची आईपेक्षा तुमची खूप जवळची मैत्रीण असते. त्यामुळेच तिचा विरोध असून ती शेवटी तुम्हाला परवानगी देत असते. स्त्रीच्या प्रत्येक दुःखात ती तुमच्यासोबत पाठीशी असते. तिचे पै पै वाचवून कॉलेजला जाताना पैसे देणे. रात्री भांडी एकत्र घासताना खूप गप्पा मारणे. रात्री एकत्र एकच सिरीयल पाहून भाऊ -वडिलांना हरवणे आणि यात अप्रत्यक्ष आईची बाजू घेणे ह्या सर्व गोष्टी आणि त्यावेळी भांडण करून सिरीयल पाहून जितकी मजा यायची आता हातात रिमोट असूनही येत नाही. आणि सकाळी आई उठवायला आलीच तर अंग दुखतंय असे सांगून आणखी झोपून राहणे. खरंच ते दिवस आठवून खूप एकटे वाटायला लागते.

४) तुमचे घर

त्या घरात तुम्ही लहानाचे मोठे झालेत. लहानपणी त्याच्या अंगाखांद्यावर खेळले असतात. आणि ते बांधण्यासाठी वडिलांनी किती कष्ट घेतले असतात किंवा तुमचे जुने टाईपचे घर आठवून नॉस्टॅल्जिया वाटायला लागतो.

५) तुमच्या मैत्रिणी

आजही तुमच्या मैत्रिणी तुमच्या संपर्कात असतील पण त्यांच्यासोबत घालवलेले दिवस सोबत पैसे नसताना खालेल्ली पाणीपुरी. जरी फेसबुक वर तिला भेटतात पण माहेरी गेल्यावर त्या मैत्रिणीची भेट घेतल्यावर किती आनंद होतो.

६) तुमचे वडील

नुसते वडिलांचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणवतात कारण त्यांनी तुमच्या सुखासाठी, शिक्षणासाठी आणि तुमच्या आवडीसाठी मग ती सहलीला जाण्याची परवानगी, जीन्स पॅन्ट घालायची, सदैव तुमची बाजू घेणारा असे वडील. आणि लग्नात सासरी पाठवताना रडून म्हणणारा ‘ मला तुझा हातचा स्वयंपाक खायला मिळणार नाही’. आणि तुम्हीही त्या शब्दांनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडला होता. अशा सर्व गोष्टींची तुम्हाला आठवण येईलच. आणि येत असेल तर नक्की आम्हाला सांगा.  

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: