आल्याचे गर्भधारणे संदर्भात आणि इतर औषधी फायदे

आले हे दिसायला जरी छोटं किंवा किरकोळ असले तरी त्याचे औषधी उपयोग खूप आहेत. आले ही जमिनीखाली मुळीच्या स्वरुपात वाढणारी कंद वनस्पती आहे. खोड जाडसर असते. आणि त्याला गाठी असतात. आल्याची पाने कापली तर त्यांना एक खास वास येतो. वरची पाने वाळल्यानंतर जमिनीखालचे आले काढतात.

आले उन्हामध्ये चांगले वाळवले कि त्याची सुंठ तयार होते. संस्कृत आणि चीनी साहित्यामध्ये अल्यासंबंधी अनेक संदर्भ आहे. आल्याचे मुल स्थान भारत असून पहिल्यांदा त्याचा प्रचार चीन मध्ये झाला. दोन्ही देशामध्ये त्याचा वापर औषध आणि मसाल्यासाठी होतो. आले आयुर्वेदामध्ये वातनाशक म्हणून प्रसिद्ध आहे.पोटातील वायू चा नाश करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. स्नायुमध्ये वेदना होत असतील तर आले बाहेरून लावतात. इतर मसाल्याच्या पदार्थ प्रमाणे आले सुद्धा कामोत्तेजक आहे.

कामोत्तेजक 

आल्याचा रस कामोत्तेजक आहे. अर्धा चमचा आल्याचा रस, मध आणि अर्धवट उकळलेले अंडे रोज रात्री झोपताना महिनाभर घ्यावेत्यामुळे लैंगिक अवयवांना बळ मिळते.  नपुंसकत्व दूर होते आणि संभोग पूर्व विर्यस्खलन होत नाही. स्वप्न दोष दूर होतो.. (तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्तरांच्या सल्ल्याने हे करा )

आल्याचे आरोग्य विषयक फायदे
खोकला-सर्दी

खोकला असेल तर आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीन चार वेळा घ्यावा. सर्दी असेल तर आले टाकून केलेल्या चहाने सुद्धा सर्दी बरी होते. खूप सर्दी झाली असल्यास सुंठ वेखंडाचा लेप शिजवून(कोमट) कपाळाला लावल्यामुळे सर्दी कमी होते.

पोटाचे विकार

पोटात गुबारा धरणे, पोट दुखणे, आणि इतर पचन विकार यांवर आले अत्यंत गुणकारी आहे . पचन विकार होऊ नये म्हणून आल्याचा तुकडा चावून खाल्यामुळे तोंडामध्ये चांगली लाळ सुटते आणि त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते

उलटी /पित्त

अर्धा चमचा आल्याचा रस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा पुदिन्याचा रस, एक चमचा मध असे मिश्रण घेतल्यास पित्तामुळे होणारी मळमळ, उलटी, अपचन जड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुडे होणारा अपचनाचा त्रास कमी होतो तसेच गरोदरपणातील उलट्यामुळे होणार त्रास कमी होतो. पित्त झाले असताना आल्याचा तुकडा तोंडात धरल्यामुळे मळमळणे कमी होते

वेदनाशामक

आले वेदनाशामक आहे. डोके दुखत असेल तर आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करून कपाळावर लावावा. याने दाढ दुखणे ही थांबते.

इतर उपयोग 

आले आणि सुंठ असे आल्याचे दोन प्रकार आहे. चीनी स्वयंपाकात आले मासाल्याचा पदार्थ म्हणून जास्त प्रमाणात वापरतात. आल्याचे तेल सुगंधी द्रव्यात आणी औषधी मध्ये वापरतात.

Leave a Reply

%d bloggers like this: