इंफ्लुएंजा टाइप बी (एचआईबी) Influenza type B लस बाळासाठी

 

      हिमोफेलिस इन्फ्लूएन्झाई टाइप बी (एचआईबी) हा एक गंभीर जिवाणू रोग आहे, जो सामान्यतः वयाच्या ५ वर्षाखालील मुलांना होवू शकतो. काही करणावश प्रौढांमध्ये देखील हा होऊ शकतो.

एचआयबी हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि जर आजूबाजूला इतरत्र कोणत्याही मुलांना किंवा प्रौढांना हा रोग झाला असेल तर त्याचा संसर्ग लहान मुलांना होऊ शकतो. जर जंतू लहान मुलाच्या नाक आणि घशापर्यंतच मर्यादित राहिले तर ते आजारी पडते पण ते जंतू जर फुफ्फुसात व रक्तप्रवाहात पसरले गेले तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होते.

इंफ्लुएंजा टाइप बी ( hib)

एचआयबी रोग, एचआयबी लस उपलब्ध होण्याआधी मेंदू आणि पाठीच्या कण्यातील अस्तरांचे संक्रमण म्हणजेच मेनिंजायटीस चे मुख्य कारण. मेनिनजाइटिसमुळे बहिरेपणा आणि मेंदूला आघात होऊ शकते. एचआयबी रोगामुळे घशात गंभीर सूज येणे या सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे श्वास घेणे कठिण होऊन जाते. याच्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो आणि रक्त, स्नायू, हाडे आणि हृदय आवरणाला संक्रमण होऊ शकते. काही रूग्णांमध्ये, योग्यरित्या उपचार न केल्यास त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.

एचआयबी लस

लहान मुलांना एचआयबी लसीचे, उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डचे 3 ते 4 डोस मिळालेले असतात. लसीचा पहिला डोस वयाच्या 2 महिन्या नंतर दिला जातो आणि त्यानंतर दुसरा डोस 4 महिन्यांनंतर दिला जातो. तिसरा डोस 6 व्या महिन्यात (आवश्यक असल्यास ब्रँडनुसार) दिला जातो आणि अंतिम बूस्टर, चौथा डोस वयाच्या 12 ते 15 व्या महिन्यांत दिला जातो. एचआयबी लस इतर लसीसोबत सुद्धा दिली जाऊ शकते. जरी 5 वर्षाच्या वयावरील मुलांसाठी आणि प्रौढांसाठी ही आवश्यक नसली तरी, याची एस्पेंनिआ किंवा सिकल सेल रोग असणा-यांसाठी शिफारस केली जाते.

तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की 6 आठवड्यांच्या वयापेक्षा कमी वय असणार्‍या बाळांना एचआयबी ची लस दिली जाऊ नये. त्याव्यतिरिक्त, ज्यांना लसीची अलिकडेच एलर्जीची तीव्र प्रतिक्रिया झाली असेल त्यांना लसीचा डोस घेण्यापासून परावृत्त केले पाहिजे आणि ते त्यांनी त्या एलर्जीबद्दल लस देत असलेल्या व्यक्तीला सांगणे आवश्यक आहे. जर आपण गंभीरपणे आजारी असाल तर, एचआयबी ची लसीचा डोस घेण्यापूर्वी आपले स्वास्थ्य पूर्णपणे बरे होणे हे चांगले आहे.

एचआयबीची लसीचे इतर कोणत्याही लसी किंवा औषधाप्रमाणे काही दुष्परिणाम असू शकतात. लसीकरणानंतर बहुतेक लोकांना कोणत्याही समस्या येत नाहीत. लसीमुळे गंभीर प्रतिक्रिया आढळून येणे ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. तथापि, सौम्य समस्यांमध्ये ताप आणि जेथे लस देण्यात आली होती त्याठिकाणी लालसरपणा आणि सूज येऊ शकते. या समस्या नंतर स्वत: च निघून जातात.

समस्या

लसीसह कोणतीही औषधे, गंभीर एलर्जीक प्रतिक्रिया होण्यास कारणीभूत असू शकतात, परंतु लसी पासून हे होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे. लसी पासून तीव्र दुखापत किंवा मृत्यू होण्याची शक्यता खूपच कमी असते. काहीवेळा लोकांना लसीकरणादरम्यान कमकुवतपणा येऊ शकतो. आपल्याला जर अस्वस्थ वाटत असेल किंवा आपली दृष्टी अंधुक वाटत असेल तर आपल्या डॉक्टरांना सांगा. काही लोक श्वास घेताना ताठरता आणि जेथे लस दिली गेली आहे तेथे स्नायूंची हालचाल करताना होणार्‍या वेदनांबद्दल तक्रार करू शकतात.

चक्कर येणे, हृदयाचे वाढणारे जलद ठोके, कमकुवतपणा, श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावरील सूज यांसारख्या गंभीर प्रतिक्रिया व चिन्हे दिसून येतात. तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास जवळच्या रुग्णालयात लवकर जा.

Leave a Reply

%d bloggers like this: