ऍम्नीऑटिक फ्लुइड चे गर्भातल्या बाळासाठी महत्व

         स्त्री जेव्हा गर्भ धारण करत असते. तेव्हा बाळ गर्भाशयात ज्यात वाढत असतो त्यात एक थैली असते. त्यात ते बाळ वाढत असते. आणि त्याच थैलीच्या आत बाळाच्या पोषणासाठी ऍम्नीऑटिक फ्लुइड असते. आणि ते रक्त-पोषण तत्वाचे मिश्रण असते. ऍम्नीऑटिक द्रव्य चे नियमितपणे नवीन तयार होत असते. आईचे शरीर ह्याला निर्माण करत असते. आणि नाळे पासून ह्याला बाळा पर्यंत पोहोचवत असते. बाळ ऍम्नीऑटिक द्रव्य ला २४ आठवडे पासून दोन वेळा आपल्या शरीरात शोषून घेत असतो.

 

ऍम्नीऑटिक द्रव्य कशाप्रकारे बनलेले असते ?

पहिल्या त्रैमासिकात ऍम्नीऑटिक द्रव्य मुख्य म्हणजे खनिज पदार्थ आणि पाणीपासून तयार झालेला असतो. परंतु, १२ ते १४ आठ्वड्यानंतर त्या भ्रूण च्या विकासासाठी सर्व आवश्यक तत्व जैसे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्फोलिपिड, आणि युरिया हे सर्व उपस्थित असतात.

ऍम्नीऑटिक द्रव्य ची मात्रा

सुरुवातीला गर्भाच्या काळात आणि भ्रूण चा जसा जसा विकास होत जातो तसा ऍम्नीऑटिक द्रव्य ची मात्रा वाढत जाते. २८ आठवड्याच्या दरम्यानच्या काळात १ ते १. २ लिटरच्या उंचीला जाऊन त्यात घसरण व्हायला लागते. जन्माच्या वेळी ८०० ते १००० मिलिलिटर पर्यंत असते आणि त्यानंतर ती वेगाने कमी व्हायला लागते.

ऍम्नीऑटिक द्रव्यचे महत्व

१. बाळाला चारी बाजुंनी मुलायम व सुरक्षित वातावरण तयार करून देते. त्यामुळे बाळाचे बाहेरच्या कोणत्याही झटक्यापासून सरंक्षण होत असते.

२. हे गर्भाशयातील भ्रूणाला हालचाल करायला जागा करून देत असते. त्यामुळे बाळाची वाढ खूप व्यवस्थित होते.

३. ऍम्नीऑटिक द्रव्य हे भ्रूण द्वारा शोषले जाऊन आतड्याच्या माध्यमातून ती पचन क्रिया विकसित होऊन बाळाचे मल (meconium) तयार होत असते.

४. ह्यामुळे गर्भाशयावर दाब होऊन भ्रूणाचा श्वसन क्रियाचा विकास होतो. 

Leave a Reply

%d bloggers like this: