बाळावरचे प्रेम व्यक्त करण्यापासून कोणतीही आई स्वतःला रोखू शकत नाही आणि आपल्या लाडक्याचा प्रेमाने घेतलेला पापा म्हणजे तर या प्रेमाची छोटीशी खूण असते. हे छोटेसे चुंबन बाळासाठी जीवघेणे ठरले तर..? हे अगदी खरे आहे. नॉर्थ हॅम्पशायर येथील एक २६ वर्षीय आई,बाळांचे चुंबन घेऊ नये,अशी धोक्याची सूचना पालकांना देत आहे.
डॉक्टरांच्या अहवालानूसार,या महिलेने निष्पापतेने केलेल्या चुंबनामुळे तिच्या तान्ह्याला

मेंदूज्वर नावाचा जीवघेणा आजार झाला. खूप ताप आणि धाप लागलेली असल्या मुळे ९ दिवसांच्या तिच्या बाळाला तातडीने दवाखान्यात दाखल करावे लागले. आईच्या चुंबनातून बाळाला हा भयंकर आजार झाल्याचे ऐकून पालकांना धक्काच बसला. यानंतर या आईने संपूर्ण कुटुंबाचा आनंद हिरवण्यास कारणीभूत ठरलेले बाळाचे चुंबन कधीही घेणार नाही,अशी शपथच घेतली आहे.
मेंदूज्वर म्हणजे काय?
आरोग्याशी संबंधित ही अवस्था जीवघेणी असूही शकते किंवा नसते हि,परंतु तुमचे बाळ गंभीर पडू शकते नक्की.
या आजाराची काही लक्षणे :
– जास्त ताप
– अतिथकवा
– डोके ठणकणे
– उलटी
– चिडचिड होणे
– घश्यात खरखर होणे

तुमच्या तान्ह्याचे आरोग्य धोक्यात येऊ नये असेच तुम्हाला वाटते ना,मग तुम्ही हि त्याचा पापा घेऊ नका आणि इतरांना हि घेऊ देऊ नका.
आपल्या छोटुश्या बाळाचा पापा घ्यावासा वाटणे कोणत्याही आईसाठी अगदीच साहजिक आहे,तिचाच अंश असणारा एक इवलासा जीव… एक आई आपल्या बाळाच्या चेहऱ्याचे चुंबन घेण्यापासून स्वतःला थांबवूच शकत नाही.

विषाणूजन्य संसर्गाची सुरवातीची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत पण नवजात बाळांसाठी ती अतिशय घातक असतात.मेंदूज्वरासारख्या घातक संसर्गाचा मुकाबला करण्याइतकी बाळाची प्रतिकार क्षमता सक्षम झालेली नसते कारण नवजात शिशूंमध्ये तिचा विकास हळूहळू सुरु होतो.
”निरागसतेणे घेतलेलया चुंबनाने तिच्या बाळाचे प्राण घेतलेच असते”

मेंदूज्वराचा संसर्ग झालेल्या त्या बाळाच्या आईला वाटते कि या लागण कोणत्याही व्यक्ती कडून बाळाला झालेली असू शकते ज्याच्या शरीरात या विषाणू असतील. तुम्हाला मेंदूज्वराची कोणतीही लक्षणे जाणवत नसतील तरीही या आजाराचे विषाणू तुमच्या शरीरात असू शकतात.रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या खोकल्यापासून किंवा शिंकेपासून तर कुणीच स्वतःचा बचाव करू शकत नाही.
सुदैवाने, आता तिच्या बाळात खूप सुधारणा झालेली आहे.कुटुंबातील सर्वानी घेतलेल्या काळजी आणि प्रेम आणि आधारामुळे तो लवकरच ठणठणीत बरा होईल.
सर्व मातांनी लक्षात घ्यायला हवे असा हा प्रसंग आहे,अगदी कुणालाही तुमच्या बाळाचे चुंबन देऊ नका !! ह्यात लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे की, बाळाचे वय खूप लहान असेल तर त्यावेळी ही गोष्ट जास्त लागू होते. म्हणून एकदम घाबरून जाऊ नका. फक्त याबाबतीत दक्षता घेतलेली बरी.
फोटो – मर्क्युरी प्रेस