बाळाचे नाव ठरवणे हे पालकांसाठी खूप आव्हानात्मक काम असते. अनेकजण वेगवेगळी नावे सुचवत असतात आणि तुमच्या मनात्पण अनेक नावांमुळे गोंधळ उडालेला असतो. जे नाव तुम्ही ठरवाल त्याच नावाने तुमचे बाळ या जगात त्याची ओळख बनवणार आहे त्यामुळे ही गोष्ट विचारपूर्वक ठरवण्याची आहे. हे नाव नंतर बदलता जरी येत असले तरी नाव ठरवतांना पालकांच्या मनात तर्हतर्हाचे विचार येणारच. तुम्हीपण याच विचारात असाल तर आई म्हणून हा निर्णय घेतांना खाली दिलेल्या ८ गोष्टी तुमच्या मनात नक्कीच येतात..
‘’ फक्त नावच तर ठेवायचं आहे, नो बिग डील !“

गरोदरपणाच्या सुरवातीला ह्यात काही फारसं अवघड वाटत नाही. बाळाला एक नाव द्यायचं आहे आहे आणि तशीही अनेक वेगवेगळी नावे तुम्हाला सुचत असतात आणि सुचवली जात असतात. त्यामुळे ही गोष्ट फार काही मोठी वाटत नाही. अजून ९ महिने उरलेले आहेत आणि मुलगा झाला तर काय आणि मुलगी झाली तर काय याचे अनेक पर्याय तुमच्याजवळ तयार असतात.
“ बाळाचं नाव काय ठेवायचं? खूप मोठा प्रश्न आहे!”

जशी जशी प्रसूतीची वेळ जवळ येते तसे तसे तुमच्याजवळ शेकडो पर्याय उभे असतात. सुरवातीचे आद्याक्षर काय ? ते मुलगी झाली तर काय? आणि मुलगा झाला तर काय? असे अनेक प्रश्न आणि उत्तरे तुमच्याकडे असतात. बाळाचे नाव त्याच्या आडनावाला साजेसे आहे का? मग त्याचे लाडाचे नाव काय ठेवायचे ? हेच नाव आपल्या नातेवाईकांत कोणाचे नाहीना? असे प्रश्न तुम्हाला यावेळी पडत राहतात.
“ आडनाव कोणाचे लावायचे?”

वडिलांकडचे आडनाव ठेवायचे की आईचे आडनाव लावायचे? त्याच्या नावाला कोणते आडनाव शोभते आहे? की दोन्ही आडनाव लावायचे का एक नवीन आडनाव ? अतिशय गोंधळ उडतो आणि तुम्हाला आता एका शहाण्या व्यक्तीच्या सल्ल्याची गरज भासते.
“ माझ्या मैत्रिणींना विचारू का? “
कदाचित माझ्या मैत्रिणींकडे माझ्या बाळाच्या नावासाठी काही सुपर आईडिया असतील ! आधीच तुमच्या परिवाराच्या वेगवेगळ्या आणि तेच तेच नाव सुचवण्यामुळे तुम्ही गोंधळलेल्या असता त्यामुळे तुमच्या मैत्रिणींकडे काही नवीन आणि वेगळी वाटणारी छान नावे असतील म्हणून त्यांचा एकदा सल्ला घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
“ कदाचित इंटरनेट हाच चांगला पर्याय आहे “
माझ्या मैत्रिणी अजिबात कल्पक नाहीयेत, त्यांनी सुचवलेली नावं माझ्याजवळच्या लिस्ट पेक्षा खास अशी नाहीत! तुम्ही तुमच्या मैत्रिणींना विचारलेल्या सल्ल्याचा तुम्हाला काहीच्च फायदा होत नाही. त्यांनी सुचवलेली नावे फार काही वेगळी आणि एकमेव अशी नसतात आणि त्यामुळे आता तुम्हाला सरळ गुगल चा आधार घ्यावा लागणार असे दिसते. तुमचे ऑनलाईन नाव शोधणे सुरु होते.
“ या नावांची एक मोठी यादी बनवायला हवी!”
बाळाच्या नावासाठी आता थोडा गृहपाठ मी करते. मी आणि माझ्या नवऱ्याने आपल्याला आवडणाऱ्या नावांची एक-एक यादी बनवली आणि दोघांच्या नावांची यादी जोडून त्यात जी नावे आम्हाला दोघांनही आवडली आहेत ही वेगळी काढली तर हे काम सोप्पे होईल. वेगळ्या काढलेल्या नावांमध्ये आमच्या दोघांना आवडणारे नावे असतील म्हणजे त्यातून एका नावाचा पर्याय निवडणे सोप्पे होईल!
“ अजून खूप महिने बाकी आहेत !”
ही नावांची यादी तर तयार आहे. आता तुम्हाला या यादीतून वेळेवर एक नाव निवडायचे आहे. अजून प्रसूती व्हायला बराच वेळ आहे त्यामुळे आता इतकी जास्त चिंता करायची गरज नाही. वेळेवर ह्यातल्या एका नावाची नक्कीच निवड करता येईल.
“ सगळं काही पुसून पुन्हा नवी सुरवात “
ही सगळी नावे आता मला जुनाट वाटत आहेत, ह्यात नवीन आणि युनिक असं काहीच नाही. इतके दिवस मला एकपण छान आणि वेगळं असं नाव सापडलं नाहीये ! ही नावांची यादी खूप बोर आहे. खूप सामान्य नावे आहेत यात. आता नवीन यादी बनवायला हवी. थांब, मी पूर्वाला फोन करून काही नवीन नावे विचारते. पण ‘पूर्वा‘ हे नाव पण छान आहे, नाही का?
तुम्ही आणि तुमच्या मनातला गोंधळ असाच चालू राहतो!
तर अशाप्रकारे या विचारांची रेल्वे तुमच्या मनाच्या रुळावरून सतत धावत असते. हे नाव का ते नाव? पण जास्त गोंधळून जाऊ नका. तुम्हाला एक सुंदर नाव सुचण्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. हा लेख तुमच्या परिवारासोबत आणि मैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे जरा त्यांनापण कळू देत की तुमच्या मनात नक्की काय चालू असतं ते!